Har Ghar Tiranga: राष्ट्रध्वज संहितेत केला बदल, आता रात्रीही फडकावता येणार तिरंगा

या वर्षी 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' अंतर्गत पॉलिस्टर आणि मशिनने बनवलेला राष्ट्रध्वज वापरता येणार
 Indian Flag
Indian Flagdainikgomantak
Published on
Updated on

Har Ghar Tiranga: गृह मंत्रालयाने देशाची राष्ट्रध्वज संहिता बदलली आहे, ज्या अंतर्गत आता दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी तिरंगा फडकवण्याची परवानगी असेल. तसेच आता पॉलिस्टर आणि मशिनने बनवलेला राष्ट्रध्वजही वापरता येणार आहे. 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' अंतर्गत सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' कार्यक्रम सुरू करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हे नियम बदलण्यात आले आहे.

 Indian Flag
World Athletics Championships: गोल्डन बॉय नीरज चोप्रा रोप्य पदकाचा मानकरी

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, फडकवणे आणि वापर भारतीय ध्वज संहिता, 2002 आणि राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत येतो. पत्रानुसार, भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये 20 जुलै, 2022 च्या आदेशाद्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि आता भारतीय ध्वज संहिता, 2002 च्या भाग-II च्या पॅरा 2.2 चे खंड (11) आता ते याप्रमाणे वाचले जातील: 'जिथे मैदानावर तिरंगा फडकवला जातो किंवा एखाद्या नागरिकाच्या निवासस्थानी फडकवला जातो, तो रात्रंदिवस तसाच फडकवता येणार आहे.'

 Indian Flag
BJP नेत्याच्या वेश्यालयाचा पर्दाफाश, 73 जणांना पोलिसांकडून अटक

यापूर्वी फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिरंगा फडकवण्याची परवानगी होती. त्याचप्रमाणे, ध्वज संहितेच्या दुसर्‍या तरतुदीत काही सुधारणा करण्यात आल्या. राष्ट्रध्वज हाताने कातलेला आणि हाताने विणलेला किंवा यंत्राने बनलेला असेल. तो कापूस/पॉलिस्टर/लोर/रेशीम खादीपासून बनवला जाईल. पूर्वी मशीनने बनवलेले आणि पॉलिस्टरचे राष्ट्रध्वज वापरण्यास परवानगी नव्हती. मात्र आता या मोहिमेअंतर्गत या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com