BJP नेत्याच्या वेश्यालयाचा पर्दाफाश, 73 जणांना पोलिसांकडून अटक

Meghalaya News: मेघालयच्या पश्चिम गारो हिल जिल्ह्यात पोलिसांनी एका भाजप नेत्याच्या रिसॉर्टवर छापा टाकताना वेश्यालयाचा पर्दाफाश केला.
BJP Regional Vice President Bernard N Marak
BJP Regional Vice President Bernard N MarakDainik Gomantak
Published on
Updated on

Meghalaya News: मेघालयच्या पश्चिम गारो हिल जिल्ह्यात पोलिसांनी एका भाजप नेत्याच्या रिसॉर्टवर छापा टाकताना वेश्यालयाचा पर्दाफाश केला. या रिसॉर्टमध्ये वेश्यालय चालवण्यात येत असल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. या छाप्यात पोलीस पथकाने 73 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर आरोपी हा भाजपचा प्रदेश उपाध्यक्ष असून तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांनी मौन बाळगले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पश्चिम गारो हिल जिल्ह्यातील भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक (BJP Regional Vice President Bernard N Marak) यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर छापा टाकला. या छाप्यात 6 मुलांना ताब्यात घेतले. यावेळी मुलांची अवस्था दयनीय दिसत होती. मुलांची चौकशी आणि रिसॉर्टमध्ये मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तिथे कुंटणखाना चालवला जात असल्याची पुष्टी केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 73 जणांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे.

BJP Regional Vice President Bernard N Marak
Udaipur Murder Case: आठव्या आरोपीला चार दिवसांची कोठडी, चौकशीत होणार खुलासे

400 दारुच्या बाटल्या, 500 कंडोम सापडले

पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसॉर्टवर छापा टाकला असता पोलिस पथकाला 400 दारुच्या बाटल्या आणि 500 ​​कंडोम सापडले.

दुसरीकडे, रिसॉर्टचे मालक बर्नार्ड एन. माराक हे गारो हिल स्वायत्त जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सदस्य आहेत. याशिवाय ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्षही आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. दुसरीकडे, भाजपच्या मेघालय (Meghalaya) युनिटने मौन बाळगले असून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com