
दिल्लीत H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर या श्वसनविषयक आजाराने बाधित होत आहेत. केरळमध्ये याच विषाणूमुळे अनेक मृत्यू झाल्याचे नोंदले गेले असून नवीन रुग्ण सतत समोर येत आहेत. त्यामुळे दिल्ली व आसपासच्या भागात आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, H3N2 विषाणूची लक्षणे साधारण फ्लूसारखीच असतात. यात ताप, थंडी वाजून येणे, दीर्घकाळ खोकला राहणे, नाक वाहणे किंवा बंद होणे, घसा खवखवणे आणि शरीरदुखी यांचा समावेश होतो. काही रुग्णांना डोकेदुखी, थकवा व अशक्तपणा देखील जाणवतो.
संक्रमणानंतर साधारण एक ते चार दिवसांत ही लक्षणे दिसून येतात. सुरुवातीला सौम्य स्वरूपात असलेली लक्षणे पुढे गंभीर होऊ शकतात.
डॉक्टरांच्या मते, H3N2 विषाणूचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आधीपासून दमा, मधुमेह किंवा हृदयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांवर होत आहे. अशा लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
फ्लूसारखी लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रुग्णांनी किमान ५ ते ७ दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी.
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोमट सूप, हर्बल टी आणि पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलसारखी औषधे मदत करतात, मात्र डॉक्टरांनी लिहून दिलेल्याच औषधांचा वापर करावा.
तज्ज्ञांच्या मते, व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक्स फारसे परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे स्वतःहून औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.
H3N2 चा प्रसार थांबवण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी घेणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर आणि कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर साबणाने हात धुवा.
हँड सॅनिटायझरचा वापर नियमित करा.
गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना फेस मास्क वापरणे आवश्यक आहे.
टॉवेल, कपडे, भांडी, बाथरूममधील वस्तू इतरांसोबत शेअर करू नयेत.
मोबाईल फोनची स्क्रीन वेळोवेळी स्वच्छ करा कारण त्यावर बॅक्टेरिया आणि व्हायरस सहज साचतात.
आहार पौष्टिक ठेवा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.