Crime News: हा नवरा आहे की सैतान? पत्नीची बोटं कापली, शीर धडावेगळं करुन फ्रिजमध्ये ठेवलं, मृतदेह खोलीतच सडत ठेवला; 25 वर्षीय 'रिया'ची निर्घृण हत्या

Guwahati Crime News: आसाममधील गुवाहाटी येथून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली.
Guwahati Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Guwahati Crime News: गुवाहाटी येथून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली. येथील बेल्टोला परिसरातील वशिष्ठपूर हाटीगाव येथे एका व्यक्तीने स्वतःच्याच पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन 'श्रद्धा वालकर' हत्याकांडाची पुनरावृत्ती केली. नराधम पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचे मुंडके शरीरापासून वेगळे केले आणि ते प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये लपवून ठेवले. एवढेच नाही तर तिची बोटेही कापली. उर्वरित मृतदेह खोलीत तसाच सडत होता. या भयानक घटनेमुळे संपूर्ण गुवाहाटी शहरात एकच खळबळ उडाली.

रिया तालुकदार असे 25 वर्षीय दुर्दैवी मृत महिलेचे नाव असून ती एका स्थानिक बुटिकमध्ये काम करत होती. रियाचा विवाह काही महिन्यांपूर्वीच रामानुजन गोस्वामी नावाच्या कॅब चालकाशी झाला होता. रविवारी जेव्हा बंद घरातून अचानक असह्य दुर्गंधी येऊ लागली आणि शेजाऱ्यांना मळमळू लागले, तेव्हा त्यांना काहीतरी अघटीत घडल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना (Police) फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बंद घराचे कुलूप तोडले असता आतमध्ये असलेले भयानक दृश्य पाहून स्वतः पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.

Guwahati Crime News
Crime News: चाकू हल्ल्याच्या दोन घटनांनी खळबळ! 'जीआयएम'च्या विद्यार्थिनीवर हल्ला; दुसरीकडे आमदाराच्या भावाला भोसकले

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि काम आटोपून घरी परतलेल्या आरोपी रामानुजन गोस्वामीला घटनास्थळावरुनच ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने लगेच गुन्हा कबूल केला. तर दुसरीकडे, फॉरेन्सिक पथक आणि सीआयडीच्या पथकाने घटनास्थळावरुन महत्त्वाचे पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासानुसार, ही हत्या 24 ते 48 तासांपूर्वी झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला.

Guwahati Crime News
Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

तर छिन्नविछिन्न मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीने एवढे टोकाचे आणि क्रूर पाऊल का उचलले, यामागच्या मुख्य कारणाचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच नव्याने सुरु झालेल्या संसाराचा असा अत्यंत भयानक आणि खळबळजनक शेवट झाल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com