Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Bengaluru Mother Kills Twin Babies: बंगळुरुच्या वज्रहल्ली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली.
Bengaluru Mother Kills Twin Babies
Bengaluru CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru Mother Kills Twin Babies: बंगळुरुच्या वज्रहल्ली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. लग्नानंतर तब्बल 24 वर्षांनी आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्माला आलेल्या अवघ्या चार महिन्यांच्या जुळ्या चिमुकल्या मुलींची त्यांच्याच 40 वर्षीय आईने गळा आवळून हत्या केली. उमा देवी असे या महिलेचे नाव असून, पोटच्या गोळ्यांचा जीव घेतल्यानंतर तिने स्वतःही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (1 सप्टेंबर) दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून पोलीसही चक्रावले आहेत.

महिलेचा पती रामलिंगप्पा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे लग्न 2002 मध्ये झाले होते. लग्नाला 24 वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने या दांपत्याने वैद्यकीय उपचारांचा आधार घेतला. अखेर आयव्हीएफ उपचारांना यश येऊन 5 मे 2026 रोजी उमा देवी हिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. दीर्घ प्रतीक्षेनंतर घरात पाळणा हलल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र, बाळंतपणानंतर उमा देवीच्या स्वभावात अचानक विचित्र बदल होऊ लागले.

Bengaluru Mother Kills Twin Babies
Goa Crime: गोव्यात गुन्हे वाढतायत, गोमंतकीयांच्या सुरक्षेचे काय? गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

तिला लहान मुलांबद्दलचा लळा संपल्यासारखा वाटत होता आणि ती मुलींना अनाथ आश्रमात सोडून देण्याचा हट्ट पतीकडे करु लागली होती. तिच्या अशा मानसिक अवस्थेमुळे पती रामलिंगप्पा यांनी तिला बंगळुरुतील (Bengaluru) निमहंस आणि राघवेंद्र रुग्णालयात मानसोपचारासाठी दाखल केले होते.

Bengaluru Mother Kills Twin Babies
Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्ट केले होते की, बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे आणि 'पोस्टपार्टम डिप्रेशन' या तीव्र मानसिक त्रासामुळे तिचे वर्तन असे असामान्य झाले. मंगळवारी दुपारी पती रामलिंगप्पा कामानिमित्त बाहेर गेले असताना उमा देवीने दोन्ही मुलींची हत्या केली आणि स्वतःला एका खोलीत बंद करुन घेतले. पती घरी परतल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडला असता उमा देवी ओढणीच्या साह्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती, तर बाजूलाच दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पडले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com