Gujarat Crime: गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकोट जिल्ह्यात हेमुभाई नावाच्या एका व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने 'गिलोटिन' सारख्या यंत्राचा वापर करुन आपले डोके कापून आत्महत्या (Suicide) केली.
राजकोट पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. आत्महत्या केलेल्या जोडप्याने स्वत: घरी गिलोटिनसारखे यंत्र बनवले होते, असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, हेमुभाई मकवाना (38) आणि त्यांची पत्नी हंसाबेन (35) यांनी विंछिया गावातील त्यांच्या शेतातील झोपडीत ही आत्महत्या केली, अशी माहिती विंछिया पोलिस (Police) स्टेशनचे उपनिरीक्षक इंद्रजितसिंग जडेजा यांनी दिली. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडल्याचेही त्यांनी सांगितले.
मृत व्यक्तीच्या भावाने सांगितले की, 'दोघेही दोन दिवसांपूर्वी मुला-मुलीला मामाच्या घरी सोडून आले होते. मुले अनेकदा मामाच्या घरी जात असत. त्यामुळे ही काही असामान्य गोष्ट नव्हती. होय, हे खरे आहे की, गेल्या एक वर्षापासून दादा आणि वहिनी रोज झोपडीत पूजा करत होते. पण, दोघंही असं काही करतील याची कुणालाही कल्पना नव्हती.'
घटनास्थळी एक सुसाइड नोट मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, 'जय भगवान, जय भोलेनाथ, आम्ही दोघेही स्वेच्छेने स्वतःच्या हाताने आपल्या प्राणांची आहुती देत आहोत.
आमच्या कुटुंबातील इतर सदस्य खूप चांगले आहेत. माझा भाऊही आमच्यावर खूप प्रेम करतो. आजपर्यंत त्याने माझ्या बायकोला कधीच चुकीचे बोलले नाही. ते सर्व आमची खूप काळजी घेतात. त्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारे चौकशी होऊ नये. आपण स्वेच्छेने आपले जीवन संपवत आहोत. त्यामुळे आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्रास देऊ नका.'
याशिवाय, भावाने आमच्या मुलीची काळजी घ्यावी, असेही सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ही सुसाईड नोट भिंतीवर चिकटवली होती. मृताच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटचे हस्ताक्षर हे 38 वर्षीय हेमुभाई मकवाना यांचे आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांनी कोणाच्या सांगण्यावरुन हे पाऊल उचलले याचाही तपास सुरु आहे. ही हत्याच नाही का? पोलीस अशा सर्व बाजूंनी बारकाईने तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.