Gujarat चे मुख्यमंत्री बदलले, मग आता पुढे काय?

मोदी-शहा (Modi-Shah)गुजरातमध्ये मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; बालेकिल्ला राखण्यासाठी मोदी-शहांच्या हालचाली सुरू.
Modi-Shah
Modi-ShahDainik Gomantak

गुजरात: विजय रुपाणी (Vijay Rupani)यांनी मुख्यमंत्रिपदाचा (CM)राजीनामा दिला. त्यानंतर आज भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel)यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा केली. भूपेंद्र पटेल येत्या काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेषबाब म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भूपेंद्र पटेल यांचे नाव कुठेच नव्हते. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोरधन झडफिया या सर्वांची नवे पुढे येत होती. मात्र भाजप नेतृत्त्वाने भूपेंद्र पटेल यांना पसंती देत मुख्यमंत्री केली.

Modi-Shah
भूपेंद्र पटेल बनले गुजरातचे नवे मुख्यमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जवळचे मानले जाणारे विजय रुपाणी यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शनिवारी दुपारी रुपाणी यांनी राज्यपालांची भेट घेतली. रुपाणी हे राजीनामा देतील असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा शुक्रवारीच झाल्याचे समजते. त्याचबरोबर शुक्रवारी रात्री अमित शाह गुजरातला आले होते. आणि तात्काळ ते सकाळी दिल्लीला परतले.

मंत्रिमंडळात (Cabinet)मोठे बदल होण्याची दाट शक्यता :

गुजरातचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजपाच्या नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी काही बदल अपेक्षित आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आता अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे. तर यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. रुपाणी यांना घेऊन भाजपने आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास पक्ष पराभूत होईल असा अंदाज होता. अशी शक्यता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर येत आहे. त्यामुळेच रुपाणी यांना मंत्री पदावरून हटवण्यात आल्याचेही समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com