भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे आता गुजरातचे नवीन मुख्यमंत्री (Gujarat Chief Minister) असणार आहेत पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे . गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी अचानक राजीनामा दिल्यांनतर सर्वांचे लक्ष गुजरातकडे लागले होते. डिसेंबर 2022 मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि अशात हा राजीनामा आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. आणि गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. (Bhupendra Patel is now Gujarat new Chief Minister)
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीप प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, सीआर पाटील आणि गोरधन झडाफिया इतकि नावे होती मात्र गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अंतिम शिक्का भूपेंद्र पटेल यांच्या नावावर झाला आहे.
याआधीच , जेव्हा रुपाणी यांना शेवटच्या वेळी मुख्यमंत्री बनवण्यात आले होते, तेव्हा नितीन पटेल यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, नंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा रूपाणी यांच्या नावाची घोषणा झाली, आणि सर्वांना आश्चर्य वाटले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांना हटवल्यानंतर गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक मोठे बदल होऊ शकतात. अनेक विद्यमान मंत्र्यांना विश्रांती दिली जाऊ शकते , तर काही नवीन मंत्री मंत्रिमंडळात येऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात विजय रुपाणी यांच्या चेहऱ्याच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुका जिंकणे भाजपला कठीण वाटत होते. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी दावा केला आहे की ऑगस्ट महिन्यात भाजप आणि आरएसएसने एक गुप्त सर्वेक्षण केले होते.त्यामुळे विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा देखील आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.