Aero India Show 2023: हा केवळ शो नाही, ही तर भारताची ताकद... पंतप्रधान मोदींचे मत

बेंगळुरू येथे एअरो इंडिया शोचे उद्घाटन
Aero India Show 2023 | PM Narendra Modi
Aero India Show 2023 | PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Aero India Show 2023: भारतातील सर्वात मोठ्या एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एअरो इंडियाचा 14 व्या हंगामाची सुरवात सोमवारी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या वेळी पंतप्रधान म्हणाले की, 21व्या शतकातील नवा भारत कोणतीही संधी सोडणार नाही आणि आपल्या मेहनतीत कोणतीही कमतरता भासणार नाही.

आम्ही तयारी करत आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात क्रांती आणत आहोत. हा केवळ शो नाही तर भारताची ताकद आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Aero India Show 2023 | PM Narendra Modi
Aero India Show 2023: आशियातील सर्वात मोठा एरो शो आजपासून बेंगळुरूमध्ये; पीएम मोदी करणार उद्घाटन

5 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 98 देश सहभागी होत असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, एरो इंडिया शो हा केवळ शो नसून देशाची ताकद आहे. नवी उंची हेच भारताचे आजचे वास्तव आहे. स्वावलंबी बनून भारताची ताकद सतत वाढत आहे.

जेव्हा एखादा देश नवीन विचार, नवीन दृष्टिकोन घेऊन पुढे जातो, तेव्हा तेथील यंत्रणाही नव्या विचारसरणीनुसार जुळवून घेऊ लागतात. भारत आज एक संभाव्य संरक्षण भागीदारदेखील आहे, आज देश नवीन उंचीला स्पर्श करत आहे आणि त्या ओलांडत आहे.

21व्या शतकातील नवा भारत कोणतीही संधी सोडणार नाही आणि आपल्या मेहनतीत कोणतीही कमतरता भासणार नाही. आम्ही तयारी करत आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात क्रांती आणत आहोत. अनेक दशकांपासून संरक्षण सामग्रीचा सर्वात मोठा आयात करणारा देश आता जगातील 75 देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे.

गेल्या 5 वर्षात देशाच्या निर्यातीत 6 पट वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये, आम्ही आतापर्यंत $1.5 बिलियन पेक्षा जास्त निर्यातीचा विक्रमी आकडा पार केला आहे.

संरक्षण हे असेच एक क्षेत्र आहे ज्याची बाजारपेठ सर्वात गुंतागुंतीची मानली जाते. पण भारताने आपल्या संरक्षण क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. संरक्षण उपकरणांची निर्यात 2025 पर्यंत $1.5 अब्ज वरून $5 अब्ज पर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.

Aero India Show 2023 | PM Narendra Modi
Delhi Mumbai Expressway: दिल्ली मुंबई अंतर 12 तासांनी कमी होणार, द्रुतगती मार्गाची 10 वैशिष्ट्ये

कार्यक्रमात, भविष्यातील महान तंत्रज्ञान, UAV क्षेत्राच्या वाढीवर देखील विशेष भर दिला जाईल. एलसीए तेजस, डॉर्नियर लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर आणि अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर यांनाही प्रोत्साहन दिले जाईल.

यासोबतच या कार्यक्रमात संरक्षण कंपन्याही सहभागी होत आहेत. यासोबतच 32 देशांचे संरक्षण मंत्रीही एरो शोमध्ये सहभागी होणार आहेत.

भारतातील युनायटेड स्टेट्स राजदूत एलिझाबेथ जोन्स या एअर शोमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. ते म्हणाले की भारत आपल्या संरक्षण क्षमतेचे आधुनिकीकरण करत आहे, अर्थातच आम्हाला भारताचे पसंतीचे भागीदार बनायचे आहे.

आम्ही परस्पर फायदेशीर सह-उत्पादन आणि सह-विकास भागीदारीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

MEA India Energy Security Statement US Tariff
PM Modi Digital India New Chapter
India Defence Procurement DAC Approves
Rajnath Singh Defence Deal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com