
देशातील डिजिटल माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या अश्लील आणि बेकायदेशीर कंटेंटवर सरकारने मोठी कारवाई करत २५ ओटीटी अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या अॅप्सवर तात्काळ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व अॅप्सवर अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांचा अपमान करणारा कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप आहे.
मंत्रालयाच्या आदेशानुसार, इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISP) यासंदर्भात अधिकृत पत्रक पाठवण्यात आलं असून, तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, जर कोणी या आदेशांचे उल्लंघन केले, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
ही बंदी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि आयटी नियम २०२१ (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) अंतर्गत घालण्यात आली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हे अॅप्स समाजात चुकीचा संदेश पसरवत असून, युवापिढीवर विपरीत परिणाम करत आहेत.
गेल्या वर्षीही अशाच प्रकारे सरकारने मोठी कारवाई करत १४ मार्च २०२४ रोजी १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्स, १९ वेबसाइट्स, १० मोबाइल अॅप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली होती.
त्या वेळी बंदीच्या कारवाईचा उद्देशही हाच होता की, महिलांविषयी अपमानकारक, अश्लील आणि बेकायदेशीर कंटेंटवर आळा घालणं. संबंधित प्लॅटफॉर्म्सवर आयटी कायदा २००० च्या कलम ६७, ६७(अ), भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९४ आणि महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व प्रतिबंध कायदा १९८६ च्या कलम ४ चं उल्लंघन केल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं.
सरकारचा स्पष्ट संदेश आहे की, भारतात कोणत्याही स्वरूपाचा बेकायदेशीर आणि अश्लील डिजिटल कंटेंट सहन केला जाणार नाही. अशा प्रकारच्या अॅप्स, वेबसाईट्स किंवा सोशल मीडिया हँडल्सवर सरकार कठोर कारवाई करत राहील.
ALTT, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul App, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix, Triflicks
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.