पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून योजना आखत आहे असे म्हणायला हरकत नाही. सर्व योजना कार्यान्वित झाल्या असून असंख्य लोक योजनांचा लाभ घेत आहेत. याच क्रमाने आता केंद्र सरकार वृद्धांच्या काळजीसाठी नवीन योजना सुरू करत आहे. या योजनेचे नाव 'पीएम स्पेशल' असे असणार आहे. या अंतर्गत वृद्धांना घरी बसून वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या योजनेमुळे वृद्धापकाळत काळजी घेणे सोईचे जाणार आहे. (PM Special Scheme)
या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत सुमारे एक लाख लोकांना जेरियाट्रिक केअर-गिव्हर्सचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. सामाजिक न्याय मंत्रालय एका आठवड्यात प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारद्वारे एक ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल, ज्यावर सर्व नोंदणीकृत आणि प्रशिक्षित वृद्ध व्यावसायिकांची यादी असणार आहे तर ते एखाद्या ई-मार्केट प्लेससारखे असेल. येथे लोक त्यांच्या सोयीनुसार वृद्धांची काळजी घेण्यासाठी व्यावसायिकांची उपलब्धता पाहू शकतील आणि त्यांना कामावर ठेवण्यास देखील सक्षम असतील. सप्टेंबरपर्यंत ही वेबसाइट सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
समाज कल्याण मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी एचटीला सांगितले की जेरियाट्रिक व्यावसायिकांच्या गरजा अद्याप योग्यरित्या पूर्ण झाल्या नाहीत. वृद्धांची काळजी घेण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित व्यावसायिक एकतर नसतात किंवा लोकांना त्यांच्याबद्दल काही माहिती नसते. अनेक वेळा अप्रशिक्षित लोकही हे काम करू लागतात, त्यामुळे वृद्धांचे आरोग्य आणि काळजी सुरक्षित हातामध्ये नसते. याशिवाय काळजी घेण्याचा खर्चही खूप जास्त असतो. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आता सरकार आपली यंत्रणा व्यावसायिक पद्धतीने बनवत आहे, ज्याला आरोग्य मंत्रालयाची मान्यता मिळणार आहे. यामुळे वृद्धांची चांगली काळजी घेता येईल आणि खर्चही पूर्वीपेक्षा कमी असेल.
सचिवांनी सांगितले की, 12 वी पर्यंत शिकलेली कोणतीही व्यक्ती जेरियाट्रिक व्यावसायिक होण्यासाठी प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकणार आहे. त्यांनी सांगितले की, सरकार या कालावधीत एससी, एसटी आणि इतर मागास समाजातील किमान 10,000 लोकांना मोफत प्रशिक्षण देणार आहे. या योजनेतून किमान एक लाख लोकांना रोजगार मिळेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वृद्धांची योग्य काळजी घेणारी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.