नवी दिल्ली-लखनऊ प्रवास करणाऱ्यांसाठी खुश खबर

देशात नव्या 400 वंदे भारत ट्रेन्स सुरू केल्या जातीर आहेत.
Tejas Express
Tejas ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली-लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस आता अतिरिक्त फेऱ्या करणार आहे. या निर्णयाचा थेट फायदा आगामी होळीच्या सणानिमित्त दिल्ली ते लखनऊ (Lucknow) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

Tejas Express
छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन, केजरीवालांचं मराठीत ट्वीट

प्रवाशांच्या सोयीसाठी, तेजस एक्स्प्रेस लखनऊ जंक्शन-नवी दिल्ली-लखनऊ जंक्शन या मार्गावर 8 मार्च ते 3 मे दरम्यान अतिरिक्त फेऱ्या करणार आहे. ही ट्रेन दर मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. 3 मे नंतर तेजस एक्स्प्रेसच्या अतिरिक्त फेऱ्या बंद होऊन ट्रेन आठवड्यातून चार दिवस रुळांवर धावणार आहे.

Tejas Express
कर्नाटकात सरकारी महाविद्यालयात टिळा लावणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रवेशावर बंदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2022 चा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. दरम्यान, अर्थ मंत्री सीतारमण यांनी भारतीय रेल्वेसाठी 2 मोठ्या घोषणा केल्या.

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले होते की, देशात नव्या 400 वंदे भारत ट्रेन्स सुरू केल्या जातील. याचबरोबर देशातील. मेट्रोचे (Metro) जाळे वाढवणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. याअंतर्गत देशातली अनेक शहरांमध्ये मेट्रो ट्रेन सुरू केल्या जातील. पुढील तीन वर्षांत 100 गती शक्ती कार्गो टर्मिनल देखील विकसित केले जातील, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dharmendra Pradhan Reaction
Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
Constitutional right to protest India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com