India Under 19: गोव्याचा व्यंकट भारताच्या संघात कायम; ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 वर्षांखालील एकदिवसीय मालिकेसाठी निवड

Chigurupati Venkata India U19: गोव्याचा युवा वेगवान गोलंदाज चिगुरुपती व्यंकट याने भारताच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय संघातील स्थान कायम राखले आहे.
Venkatesh Goa selected in India Under 19 squad
Goa cricketer Venkatesh selected for India Under 19 squadDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा युवा वेगवान गोलंदाज चिगुरुपती व्यंकट याने भारताच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय संघातील स्थान कायम राखले आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची पंधरा सदस्यीय एकदिवसीय संघात निवड झाली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून तीन एकदिवसीय व दोन मल्टि-डे सामने खेळणार आहे.

त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाची घोषणा केली. एकदिवसीय मालिकेतील सामने अनुक्रमे १८, २१ व २३ सप्टेंबर रोजी होतील, हे तिन्ही सामने राजकोट येथे होतील. मल्टि-डे सामने २७ ते ३० सप्टेंबर आणि ५ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत अनुक्रमे राजकोट व अहमदाबाद येथे खेळले जातील. १८ वर्षीय व्यंकट याची तिन्ही एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आहे.

Venkatesh Goa selected in India Under 19 squad
NHM Jobs Goa: आरोग्य खात्‍यात 127 कंत्राटी पदे भरणार; 18 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्‍याचे आवाहन

व्यंकट याने २०२५-२६ मोसमात १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांत शानदार खेळ केला होता. त्याने कुचबिहार करंडक (मल्टि-डे) क्रिकेट स्पर्धेत गतमोसमात २६ विकेट्स व २२४ धावा अशी अप्रतिम अष्टपैलू कामगिरी साधली होती. त्याची दखल राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीने घेतली होती व त्याला बंगळूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्समधील मुख्य शिबिरात स्थान मिळाले होते.भारताच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय संघात स्थान मिळाल्याबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये व व्यवस्थापकीय समितीने व्यंकटचे अभिनंदन केले आहे.

द्रविड, सेहवागच्या मुलांची निवड

संघात राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड (यष्टिरक्षक) व वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग यांचाही समावेश आहे.एकदिवसीय संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बाघेल (यष्टिरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्ही. के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टिरक्षक), व्ही. यशवीर, रोहित यादव, शाविन विनोद, मोहित उल्वा, चिगुरुपती व्यंकट, काव्यपटेल.

श्रीलंकेविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी

मागील जुलै महिन्यात भारताचा १९ वर्षांखालील संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता, तेव्हा गोव्याच्या या प्रतिभावान गोलंदाजाची मल्टि-डे संघात निवड झाली होती. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघातून दुसऱ्या युवा कसोटीत पदार्पण केले होते. भारताने तो सामना २११ धावांनी जिंकला. त्या सामन्यात व्यंकटने दोन्ही डावात मिळून ५ गडी (२-२७ व ३-२७) बाद केले होते, तसेच पहिल्या डावात २५ धावांचे योगदानही दिले होते.

Venkatesh Goa selected in India Under 19 squad
Goa Politics: "यापुढे पक्षांतर होणार नाही, याची हमी कोण देणार?" विजय सरदेसाईंचा काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला

गोव्याच्या ओमान दौऱ्यात लक्षवेधी

हल्लीच गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाने ओमानचा दौरा केला होता. तेथे ते टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळले होते. या दौऱ्यात व्यंकटने गोव्याच्या सीनियर संघातून पदार्पण केले होते, तसेच त्याची गोलंदाजी लक्षवेधी ठरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com