केरळमध्ये (Kerala) कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा सातत्याने वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री पिनाराई विजयन (CM Pinarayi Vijayan) आणि राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज (State Health Minister Veena George) यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. अलीकडे, वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पथकानेही राज्याचा दौरा केला आहे.
आढावा घेताना, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी माहिती दिली की, केंद्र केरळच्या प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन सुविधा पुरवणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती सुनिश्चित करेल. मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी, जिल्हा रुग्णालयांमध्ये 10 किलो लिटर द्रव ऑक्सिजन साठवणूक करणाऱ्या टाकीची सुविधा असलेले बालरोग आयसीयू उभारण्यात येतील अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, केंद्राने आपत्कालीन कोरोना प्रतिसाद पॅकेज -2 अंतर्गत केरळला 267.35 कोटी रुपये वाटप केले आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत होतील. याशिवाय, केरळच्या प्रत्येक जिल्ह्याला मेडिसिन पूल तयार करण्यासाठी 1 कोटी रुपये दिले जातील.
केरळमध्ये सर्वाधिक कोरोना प्रकरणे समोर येत आहेत
केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 15 ऑगस्टला देखील राज्यात 19,451 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच वेळी, 105 लोकांच्या मृत्यूनंतर, राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 18,499 वर गेली आहे. त्याचवेळी, सोमवारी म्हणजेच आज राज्यात कोरोनाचे 18,582 नवीन रुग्ण आढळले आणि 102 मृत्यूची नोंद झाली.
राज्यात एकूण बाधितांची संख्या 36,51,089 झाली आहे. केरळमध्ये पॉझिटिव्ह दर पुन्हा एकदा 15 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. राज्य आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 1,22, 970 नमुन्यांच्या तपासणीत नवीन केसेसची संख्या वाढत आहे. ज्यात संसर्गाचे प्रमाण 15.11 टक्के नोंदवले गेले. गेल्या कित्येक दिवसांपासून देशातील एकूण नवीन संसर्गाच्या सुमारे 50 टक्के रुग्णांची नोंद केरळमधूनच होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.