भारतात 'मास्तर'चं सर्वात विश्वासू, न्यायाधीश आणि शास्त्रज्ञांवर भरवसा न्हाय; संशोधनातून आले समोर

Global Trustworthiness Index-2023: इप्सॉस ग्लोबल ट्रस्टवर्दीनेस इंडेक्स-2023 चा डेटा जारी करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, शिक्षक हे भारतात सर्वाधिक भरवशाचे आहेत.
Teacher
TeacherDainik Gomantak

Global Trustworthiness Index-2023 Doctors Most Trusted in The World: इप्सॉस ग्लोबल ट्रस्टवर्दीनेस इंडेक्स-2023 चा डेटा जारी करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, शिक्षक हे भारतात सर्वाधिक भरवशाचे आहेत, तर जगात डॉक्टर सर्वाधिक भरवशाचे आहेत.

देशात शिक्षकांनंतर संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर सशस्त्र दलातील जवान आणि डॉक्टर्स आहेत. याशिवाय, भारतातील लोकांचा न्यायाधीश आणि शास्त्रज्ञांवर कमी विश्वास आहे. भारतासह 31 देशांतील 22 हजार 816 लोकांच्या सॅम्पलच्या आधारे हा डेटा तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, 53% लोकांनी भारतातील (India) शिक्षकांवर, 52% लोकांनी सशस्त्र दलांवर आणि 51% लोकांनी डॉक्टरांवर विश्वास व्यक्त केला. याशिवाय, 49% लोकांनी शास्त्रज्ञांवर, 46% न्यायाधीशांवर, 46% सामान्य लोकांवर आणि 45% लोकांनी बँकर्सवर विश्वास व्यक्त केला.

जागतिक स्तरावर, लोकांनी डॉक्टरांना 58%, शास्त्रज्ञांना 57%, शिक्षकांना 53% आणि सशस्त्र दलातील सदस्यांना सर्वात विश्वासार्ह मानलं.

Teacher
"जनतेला तो अधिकार नाही," Electoral Bonds बाबत मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात मांडली बाजू

ग्लोबल मार्केट रिसर्चर, इप्सॉस इंडियाचे सीईओ अमित अदारकर म्हणाले की, भारतीय लोक शिक्षक, सशस्त्र दल आणि डॉक्टरांवर सर्वाधिक विश्वास ठेवतात, हे आश्चर्यकारक नाही. ते पुढे म्हणाले की, हे सर्व प्रोफेशन समर्पण आणि सेवेशी संबंधित आहेत.

हे प्रोफेशन आपल्या समाजाचे महत्त्वाचे अंग आहेत. शिक्षक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे, सशस्त्र दल आपल्या सीमांना नेहमीच सुरक्षित ठेवण्यासाठी अदम्य साहस दाखवतात आणि डॉक्टर समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अखंडपणे सेवा देतात.

आदरकर पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना या तिन्ही प्रोफेशनमधील लोक बाधितांसाठी धावून आले. त्यांनी कोरोना काळात सामन्यजनांची अविरत सेवा केली.

शिक्षकांनी (Teacher) अखंडपणे विद्यार्थ्यांना विद्यादान केले. सशस्त्र दलांनी त्यांची सतर्कता कधीही कमी पडू दिली नाही आणि डॉक्टरांनी वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता कोरोना बाधितांवर उपचार केले.

Teacher
Supreme Court: समलिंगी विवाहाला कायदेशीर अधिकार मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निर्णय!

जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगात शिक्षकांना विश्वासार्ह मानले जाते

जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगभर शिक्षकांवर लोकांचा विश्वास दिसून आला. याशिवाय, भारतीयांनी कॅबिनेट मंत्री आणि सरकारी अधिकारी 39%, राजकारणी 38%, पाद्री आणि पुरोहितांवर 34%, पोलिसांवर 33%, सरकारी कर्मचारी आणि नागरी सेवकांवर 32%, वकील 32% आणि पत्रकारांवर 30% विश्वास व्यक्त केला.

या बाबतीत, जर आपण जागतिक स्तराबद्दल विचार केल्यास, 60% लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले. यानंतर 53 टक्के लोकांनी कॅबिनेट मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्यावर विश्वास व्यक्त केला.

यासंदर्भात आदरकर म्हणाले की, भारतीय राजकारण आणि सरकारी खात्यांच्या कारभारात कमालीची पारदर्शकता असूनही नागरिकांचा त्यांच्यावर अविश्वास आहे. या क्षेत्राशी निगडित लोकांची प्रतिमा सुरुवातीपासूनच स्वच्छ राहिलेली नाही. वेळोवेळी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आल्याने त्यांची प्रतिमा डागाळली आहे.

Teacher
Supreme Court on Family Planning: कुटुंब नियोजन ही प्रत्येकाची जबाबदारी, अनावश्यक प्रेगनेंसी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी : सुप्रीम कोर्ट

भारतातील कोणत्याही प्रोफेशनशी संबंधित लोकांवर किती विश्वास आहे?

शिक्षक- 53%

सशस्त्र दल - 52%

डॉक्टर - 51%

शास्त्रज्ञ - 49%

न्यायाधीश- 46%

महिला - 46%

बँकर- 45%

Teacher
'आई जे करु शकते, ते कोणी करु शकत नाही...', 8 वर्षाच्या मुलीच्या ताब्यासंबंधी HC चा ऐतिहासिक निर्णय

जगभरात डॉक्टरांनंतर शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला जातो

डॉक्टर - 58%

शास्त्रज्ञ - 57%

शिक्षक- 53%

सशस्त्र दल - 53%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com