Viral Post: बॉसची धमकी अन् Gen Z चा स्वॅग! सकाळी 7 वाजता ऑफिसला बोलावल्यावर कर्मचाऱ्यानं दिलं सडेतोड उत्तर; नेटकरी म्हणाले, "भावा, मानलं तुला"

Gen Z Employee Viral Chat: आजच्या पिढीला म्हणजेच 'जेन झी' (Gen Z) तरुणांना कामाच्या बाबतीत त्यांचे स्पष्ट विचार आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाते.
Gen Z Employee Viral Chat
Gen Z Employee Dainik Gomantak
Published on
Updated on

Gen Z Employee Viral Chat: आजच्या पिढीला म्हणजेच 'जेन झी' (Gen Z) तरुणांना कामाच्या बाबतीत त्यांचे स्पष्ट विचार आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाते. कामाचा दर्जा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा समतोल राखण्याबाबत ही पिढी कमालीची जागरुक आहे. नुकताच सोशल मीडियावर असाच एक रंजक किस्सा समोर आला आहे, जिथे एका तरुण कर्मचाऱ्याने ऑफिसला लवकर बोलावणाऱ्या बॉसला चोख प्रत्युत्तर देत आरसा दाखवला. या प्रकरणाची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु असून अनेकांनी या कर्मचाऱ्याचे समर्थन केले आहे.

एका बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना सकाळी 7 वाजताच्या 'व्हर्च्युअल मीटिंग'साठी चक्क साडेसहा वाजता ऑफिसमध्ये हजर राहण्याचा सक्त आदेश दिला होता. इतकेच नाही तर, ऑफिसला न येणे हे बेशिस्तपणाचे लक्षण मानले जाईल आणि नियमांचे उल्लंघन केल्यास थेट निलंबन केले जाईल, अशी धमकीही व्हॉट्सॲप मेसेजद्वारे दिली होती. या मेसेजमध्ये "ऑफिसला पोहोचताच रिपोर्ट करा," असेही बजावण्यात आले होते. बॉसच्या अशा या हुकूमशाही वृत्तीमुळे कर्मचारी धास्तावण्याऐवजी एका 'जेन झी' कर्मचाऱ्याने अत्यंत शांतपणे पण तितक्याच प्रभावीपणे त्याला उत्तर दिले.

Gen Z Employee Viral Chat
Viral Post: 'गोव्यात भारी वाटलं, परत निघताना मात्र त्रास का'? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; बस, टॅक्सीवरती नेटकऱ्यांच्या कमेंट्स

या कर्मचाऱ्याने आपल्या उत्तरात लिहिले की, तो व्हर्च्युअल मीटिंगसाठी ऑनलाइन उपस्थित राहील, पण त्याला ऑफिसमध्ये येणार नाही. त्याने दिलेला तर्क अत्यंत सडेतोड होता. त्याने म्हटले की, जर मीटिंगचे स्वरुप व्हर्च्युअल आहे, तर मग ऑफिसला येण्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. केवळ उपस्थितीऐवजी लोकेशनच्या मुद्द्यावरुन निलंबनाची धमकी देणे, हा सत्तेचा गैरवापर असल्याचेही त्याने सुनावले. @niilexis नावाच्या एक्स हँडलवरुन या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला असून तिथे या कर्मचाऱ्याला "खरा हिरो" म्हणून संबोधले जात आहे.

Gen Z Employee Viral Chat
Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

सोशल मीडियावर (Social Media) या पोस्टवर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. नेटिझन्सच्या मते, जेव्हा तंत्रज्ञानामुळे घरातून काम करणे सोपे झाले आहे, तेव्हा अशा छोट्या गोष्टींसाठी ऑफिसला बोलावणे म्हणजे विनाकारण 'बॉसगिरी' करणे होय. अनेकांनी याला जुन्या विचारसरणीची कार्यसंस्कृती आणि आजच्या लवचिक कार्यसंस्कृतीमधील संघर्ष म्हटले. एकजण तर म्हणाला, भावा तुला मानले. कर्मचाऱ्याने ज्या आत्मविश्वासाने आपली बाजू मांडली, त्याचे सर्वत्र कौतुक होत असून "कामाच्या ठिकाणी आत्मसन्मान राखणे किती महत्त्वाचे आहे," हे या उदाहरणावरुन अधोरेखित झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com