Gas Cylinder Explosion in Dehradun: डेहराडूनमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे मोठी दुर्घटना, 4 मुलींचा होरपळून मृत्यू

Uttarakhand News: उत्तराखंडमधील डेहराडून (Dehradun) येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागली आणि या अपघातात 4 मुलींचा मृत्यू झाला.
Gas Cylinder Blast
Gas Cylinder Blast Dainik Gomantak
Published on
Updated on

Gas Cylinder Explosion in Dehradun: उत्तराखंडमधील डेहराडून (Dehradun) येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागली आणि या अपघातात 4 मुलींचा मृत्यू झाला.

डेहराडूनच्या चकराता तहसीलमधील तुनी भागात ही घटना घडली. आग लागल्यानंतर 4 मुली त्यात अडकल्या आणि आगीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सुमारे 5 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आल्याचे चकराताचे उपजिल्हाधिकारी युक्ता मिश्रा यांनी सांगितले.

मात्र भीषण आगीमुळे लाकडी घर पूर्णपणे जळून खाक झाले. आग लागल्यानंतर, अडीच ते 12 वर्षे वयोगटातील चार मुलींचा एसडीआरएफच्या मदतीने शोध घेण्यात आला, मात्र नंतर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

Gas Cylinder Blast
Uttarakhand Government Decision: सक्तीने धर्मांतर केल्यास 'इतकी' वर्षे तुरूंगवास

आगीमुळे 4 मुलींचा मृत्यू झाला

तुनी पुलाजवळ एका घरात दोन कुटुंब राहतात, अशी माहिती उपजिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली, त्यावेळी मुलींच्या माता कपडे धुण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.

याशिवाय, आग लागल्यानंतर एक पुरुष आणि एक मुलगा घराबाहेर पडण्यात यशस्वी झाले. पण मुली त्यातच अडकल्या.

घराला आग लागण्याचे कारण

उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरात आग लागण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेचे नेमके कारण काय, हे तपासानंतरच कळेल.

डेहराडून (Dehradun) जिल्ह्यातील तुनी पुलाजवळ काल संध्याकाळी एका घराला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

Gas Cylinder Blast
Uttarakhand मध्ये पुन्हा मोठे फेरबदल, भाजप अध्यक्षपदावरुन मदन कौशिक यांना हटवले

सीएम धामी यांनी ही माहिती दिली

तथापि, आग लागल्यानंतर उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट केले की, आज चकराता येथील तिउनी पुलाजवळील 4 मजली घराला आग लागल्याने तिथे काही लोक अडकल्याचे वृत्त आहे.

मी तिथे राहणाऱ्या कुटुंबांच्या कल्याणासाठी कामना करतो. पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर आहे. अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com