Garud Commando: एअरफोर्सच्या 23 वर्षीय गरुड कमांडोची ड्युटीवर असताना आत्महत्या, स्वतःच्या सर्व्हिस पिस्तुलाने...!

Garud Commando: भारतीय हवाई दलाच्या एका गरुड कमांडोने ड्यूटीवर असताना आत्महत्या केली.
Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Garud Commando: भारतीय हवाई दलाच्या एका गरुड कमांडोने ड्यूटीवर असताना आत्महत्या केली. हा कमांडो गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुजजवळील एअरफोर्स स्टेशनवर तैनात असल्याची माहिती मिळाली आहे.

मात्र ड्युटीवर असताना त्याने आपल्या सर्व्हिस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना 16 नोव्हेंबरच्या पहाटे घडल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.

गरुड कमांडो नाइट ड्युटीवर तैनात असल्याचे पोलिसांनी सांगितले. भुज 'ए' डिव्हिजन पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक डीजे ठाकोर यांनी सांगितले की, योगेश कुमार महतो असे 23 वर्षीय तरुण कमांडोचे नाव आहे.

आर्थिक समस्या आणि वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या

दरम्यान, हवाई दलाच्या गरुड कमांडोने आर्थिक समस्या आणि इतर काही वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली असावी, असे पोलिसांनी सांगितले.

ते म्हणाले की, “महतो झारखंडचा रहिवासी होता आणि भुज एअर फोर्स स्टेशनवर भारतीय हवाई दलाच्या गरुड कमांडो फोर्स युनिटमध्ये आपली सेवा बजावत होता.

आम्हाला कळले की, तो काही आर्थिक समस्यांचा सामना करत होता आणि झारखंडमध्ये (Jharkhand) राहणाऱ्या त्याच्या आईच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे तो तणावाखाली होता.'' गरुड कमांडो फोर्स हे भारतीय हवाई दलाचे एक विशेष दल आहे, ज्याला महत्त्वाच्या हवाई तळांचे संरक्षण करण्याचे काम दिले जाते.

Crime News
Bus Accident in Doda Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये 250 मीटर खोल दरीत कोसळली बस; 36 हून अधिक जणांचा मृत्यू, 17 जखमी

एअरफोर्स स्टेशनवर डोक्यात गोळी झाडली

पोलिसांनी दाखल केलेल्या रिपोर्टनुसार, 16 नोव्हेंबरच्या पहाटे भुज एअरफोर्स स्टेशनवर नाइट ड्युटीवर असताना महतोने त्याच्या पिस्तुलाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. महतोने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजल्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी महेंद्र प्रताप सिंग यांनी त्याला जेआय जनरल रुग्णालयात दाखल केले, तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांच्या (Police) म्हणण्यानुसार, सिंह यांनी त्यांना सांगितले की महतो एलएसी किंवा 'लीडिंग एअरक्राफ्ट्समन' म्हणून काम केले होते आणि तो भारतीय हवाई दलाच्या स्पेशल फोर्स युनिटचा भाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com