Mukhtar Ansari: गँगस्टरमधून राजकारणी झालेले मुख्तार अन्सारी यांना गुरुवारी गँगस्टर कायद्यांतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी आमदार मुख्तार अन्सारी हे गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात आहेत. मुख्तार अन्सारी यांना 1996 मध्ये गाझीपूरमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात जमीन हडप, खून आणि खंडणीच्या आरोपांसह किमान 49 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गाझीपूर जिल्हा प्रशासनाने मुख्तार अन्सारी यांच्या कथित बेकायदेशीर कमाईतून खरेदी केलेले 1.901 हेक्टरचे दोन भूखंड जप्त केले आहेत, ज्याची किंमत 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जुलैमध्ये, उत्तर प्रदेश पोलिसांनी मुख्तार यांचा भाऊ अफजल अन्सारीची 14.90 कोटी रुपयांची मालमत्ता गँगस्टर कायद्यांतर्गत जप्त केली होती.
अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली
यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्तार अन्सारी यांना बुधवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अन्सारी अजूनही तुरुंगात आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच वेळा आमदार असलेले अन्सारी हे उत्तर प्रदेशातील बांदा येथील तुरुंगात बंद आहेत. या प्रकरणी ईडीने गेल्या वर्षी 59 वर्षीय अन्सारी यांची चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने त्यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत ताब्यात घेतले होते. एजन्सीने जारी केलेल्या वॉरंटच्या आधारे त्यांना प्रयागराज न्यायालयात (Court) हजर करण्यात आले.
तसेच, मुख्तार अन्सारी यांच्यावर जमीन हडप, खून आणि खंडणीसह किमान 49 गुन्हेगारी गुन्ह्यांसह ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर उत्तर प्रदेशात खुनाचा प्रयत्न आणि खुनासह अनेक खटल्यांमध्ये खटला सुरु आहे. ईडीने यावर्षी मुख्तार अन्सारी यांच्या 1.48 कोटी रुपयांच्या सात स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या.
दुसरीकडे, ऑगस्टमध्ये, एजन्सीने मुख्तार अन्सारी यांचा मोठा भाऊ आणि बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानावर आणि गाझीपूर, मऊ जिल्हे आणि लखनऊमधील काही ठिकाणी छापे टाकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीपूर जिल्हा प्रशासनाने मुख्तार अन्सारी यांच्या कथित बेकायदेशीर उत्पन्नातून विकत घेतलेले 6 कोटी रुपयांचे दोन भूखंडही जप्त केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.