G20 Summit: फूड, अ‍ॅग्रीकल्चर अन् फर्टिलाइजरबाबत मोठा निर्णय, महागाईवरील नियंत्रणासाठी...

G20 Summit 2023: जागतिक आर्थिक शक्तींच्या गटाची शिखर परिषद सुरु झाली आहे. यंदाच्या G-20 परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
G20 Summit 2023
G20 Summit 2023Dainik Gomantak

G20 Summit 2023: जागतिक आर्थिक शक्तींच्या गटाची शिखर परिषद सुरु झाली आहे. यंदाच्या G-20 परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. G20 परिषदेत जगभरातील वाढत्या महागाईवरही नेत्यांनी चर्चा केली आहे.

G20 नेत्यांनी सांगितले की, वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे जीवन जगण्याच्या खर्चावर दबाव येत असून त्यांनी फूड, अ‍ॅग्रीकल्चर आणि फर्टिलाइजर क्षेत्राबाबत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

G20 च्या बैठकीत सांगण्यात आले आहे की, या सर्व क्षेत्रांमध्ये खुला, निष्पक्ष, पूर्वानुमानयोग्य आणि नियमावर आधारित व्यापार सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच जागतिक व्यापार संघटनेच्या संबंधित नियमांनुसार निर्यातीवर बंधने न घालण्याचे वचनही देण्यात आले आहे.

G20 Summit 2023
G20 Summit 2023: ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी ‘आयईए’चे प्रयत्न

विकसनशील देश मदत करतील

G20 देशांनी नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारुन, सदस्य देशांनी खाद्य सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विकसनशील देशांच्या प्रयत्नांना आणि क्षमतांना पाठिंबा देण्यास वचनबद्ध केले आहे.

त्यांनी परवडणारे, सुरक्षित, पौष्टिक आणि आरोग्यदायी खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी आणि पर्याप्त भोजन अधिकाराच्या प्रगतीशील प्राप्तीला प्रोत्साहन देवून एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध केले आहे.

घोषणापत्र जारी

घोषणापत्रात म्हटले आहे की, आम्ही खाद्य सुरक्षा आणि पोषण 2023 वरील G20 डेक्कन उच्च-स्तरीय तत्त्वांनुसार सर्वांसाठी जागतिक खाद्य सुरक्षा आणि पोषण वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

हे साध्य करण्यासाठी, सदस्य देशांनी खाद्य आणि खतांचा मुक्त व्यापार सुलभ करण्यासह सहा उच्च-स्तरीय तत्त्वांना वचनबद्ध केले.

G20 Summit 2023
G20 Summit Goa 2023: जागतिक उद्दिष्टापूर्वीच भारत क्षयरोग मुक्त होणार- डॉ. मांडविय

त्यात पुढे म्हटले की, ते खुले, निष्पक्ष, पूर्वानुमानयोग्य आणि नियमांवर आधारित कृषी, खाद्य आणि खत व्यापार सुलभ करण्यासाठी, निर्यात प्रतिबंध किंवा निर्बंध लादत नाहीत. त्याचबरोबर, संबंधित WTO नियमांनुसार बाजारातील विकृती कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे.

भारतातील गहू आणि तांदूळ निर्यातीवर बंदी

खाद्य महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताने गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मुक्त व्यापाराव्यतिरिक्त, G20 नेत्यांनी खाद्याच्या किमतीतील अस्थिरता टाळण्यासाठी आणि अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कृषी बाजार माहिती प्रणाली (AMIS) आणि ग्रुप ऑन अर्थ ऑब्झर्वेशन ग्लोबल अ‍ॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग (GEOGLAM) अंतर्गत खते आणि वनस्पती तेलांवर लक्ष केंद्रित केले.

G20 Summit 2023
G20 Meeting: G20 मध्ये सहभागी राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर महात्मा गांधींना केले वंदन

गव्हासह या धान्यांवर हा निर्णय घेण्यात आला

कृषी प्रमुख शास्त्रज्ञांच्या (MACS) 12 व्या G20 बैठकीत G20 सदस्यांच्या सहभागाच्या परिणामांचे स्वागत करत सदस्य राष्ट्रांनी बाजरी, ज्वारी आणि तांदूळ, मका यासह इतर पारंपारिक आणि लागवडीत पिकांसह हवामान-सहिष्णु आणि पौष्टिक तृणधान्ये विकसित करण्याचे स्वागत केले. संशोधन सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यावर सहमती झाली आहे.

किमती विक्रमी पातळीपेक्षा कमी आहेत

याव्यतिरिक्त, G20 नेत्यांनी नमूद केले की, जागतिक खाद्य आणि उर्जेच्या किंमती त्यांच्या सर्वोच्च पातळीपासून कमी झाल्या आहेत, परंतु जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता लक्षात घेता, खाद्य आणि ऊर्जा बाजारांमध्ये उच्च पातळीच्या अस्थिरतेची शक्यता कायम आहे.

या संदर्भात, त्यांनी खाद्य आणि ऊर्जा असुरक्षिततेचे व्यापक आर्थिक परिणाम आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्यांचे परिणाम यावरील G20 अहवालाकडे लक्ष वेधले.

G20 Summit 2023
Prime Minister Narendra Modi: PM मोदींच्या भाषणात 'मोदी-अदानी भाई-भाई' च्या घोषणा; पंतप्रधान म्हणाले...

पौष्टिक आहार दिला जाईल

खाद्य सुरक्षा, पोषण आणि महिलांचे कल्याण यावर भर देऊन, या घोषणेमध्ये समावेशक, शाश्वत आणि हवामानास अनुकूल शेती आणि खाद्य प्रणालींमध्ये गुंतवणुकीला (Investment) प्रोत्साहन देऊ, असे म्हटले आहे. त्याचबरोबर, शालेय पोषण आहार कार्यक्रमासही प्रोत्साहन दिले जाईल, असेही पुढे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com