G20 Meeting: G20 चे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आहे. सध्या दिल्लीत G 20 ची परिषद सुरु असून जगभरातील राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेसाठी उपस्थित राहिले आहेत. याआधी भारताच्या विविध राज्यात G20 च्या सहभागी राष्ट्रप्रमुखांना या परिषदेसाठी आमंत्रित केले होते.
आज या G20 च्या शिखर परिषदेचा दुसरा दिवस आहे. या शिखर परिषदेला पोहचण्याआधी सर्वराष्ट्रप्रमुख राजघाटावर महात्मा गांधीच्या समाधीला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना खादीवस्र देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पाठीमागे साबरमती आश्रमाचे चित्र लावले होते.
परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी जेव्हा राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले होते तेव्हा कोणार्कचे चित्र लावले होते. दरम्यान, भारताच्या इतिहासात साबरमती आश्रमाचे महत्वाचे स्थान आहे.
साबरमती नदीकिनारी १९१७ ला या आश्रमाची स्थापना केली होती. महात्मा गांधीनी १९१७ ते १९३० यादरम्यान साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते. प्रसिद्ध दांडी मोर्चा किंवा सविनय कायदेभंगाला या ठिकाणाहून सुरुवात झाली होती. शांतता आणि साधेपणा हे या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.
दरम्यान, G 20 चे अध्यक्षपद भारताकडे असल्याने भारताला याचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. इतर देशांच्या कंपनी भारतात गुंतवणूक करु शकतात. रोजगाराच्या संधी वाढू शकतात. भारताच्या वस्तूंना जगभरात वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.