Former MLA Of BJP Shiladitya Dev Demands Ban on Azan: आसाममधील भाजपचे माजी आमदार शिलादित्य देव, जे अनेकदा आपल्या प्रक्षोभक विधानांमुळे वादात सापडतात, त्यांनी मशिदींमध्ये अजानवर बंदी घालण्याची मागणी करत नवीन वाद निर्माण केला आहे.
"अल्पसंख्याक समाजातील सदस्यांना दिवसातून पाच वेळा, वर्षातून 1,825 वेळा, त्यांच्या अजानने मला मानसिक त्रास देण्याचा अधिकार आहे का? धर्मनिरपेक्ष समाजात हे प्रकार मान्य आहेत का?" असे देव म्हणाले.
अजानचे पठण असंस्कृत असल्याचे वर्णन करत, होजाई मतदारसंघातील माजी आमदार असलेले देव म्हणाले, "जेव्हा मी मशिदींमध्ये एकामागून एक अजान ऐकतो तेव्हा मला वाटते की माझ्या परिसराचे अफगाणिस्तानमध्ये परिवर्तण झाले आहे. आणि तालिबान आमच्यावर नियंत्रण ठेवत आहे." अजान वाचण्यासाठी लाऊडस्पीकरमध्ये ओरडणे ही इस्लामिक धार्मिक प्रथा नसून ही एक धार्मिक प्रथा असावी."
देव पुढे म्हणाले की, त्यांच्या आमदार म्हणून कार्यकाळात त्यांनी विधानसभेच्या तत्कालीन अध्यक्षांना मुस्लिमांना नमाज अदा करता यावा म्हणून शुक्रवारी अधिवेशन लवकर थांबवण्याची जी पद्धत आहे, ती बंद करण्यात यावी अशी विनंती केली होती. धर्मनिरपेक्ष देशात असे चालत नसते.
दरम्यान, देव यांच्या या वक्तव्याबद्दल गुवाहाटी हाय कोर्टाच्या तीन वकिलांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर दिसपूर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मात्र, अजानवर बंदी घालण्यासाठी मी न्यायाधीशांसमोर अपील करणार असल्याचे माजी आमदार म्हणाले.
देव आरोप केला होता की, अल्पसंख्याक समुदायातील लोक मशिदींमध्ये बंदुका लपवतात आणि नंतर त्यांचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी करतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.