Gyanvapi Masjid Survey: ज्ञानवापीच्या सर्व्हेला अखेर परवाणगी; अलहाबाद हाय कोर्टाने फेटाळली अंजुमन इंतेजामियाची याचिका

Gyanvapi: एएसआयचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी स्पष्ट केले की सर्वेक्षणामुळे बांधकामाचे कोणतेही नुकसान होणार नाही.
Gyanvapi|Allahbad High Court
Gyanvapi|Allahbad High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Allahabad High Court Grants permission For Survey Of Gyanvapi Mosque: ज्ञानवापी परिसरात ASI द्वारे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाला वाराणसीच्या अंजुमन इंतेजामिया मसाजिदने अलाहाबाद हाय कोर्टात आव्हान दिले होत.

मात्र हाय कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत सर्वेक्षण करण्यास परवाणगी दिली आहे.त्यामुळे ज्ञानवापी कॅम्पसमध्ये ASI सर्वेक्षण सुरू राहणार आहे. सरन्यायाधीश प्रितिनकर दिवाकर यांनी हा निकाल दिला.

वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाला स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 25 ते 27 जुलै दरम्यान हायकोर्टात सुनावणी झाली होती.

27 जुलै रोजी हाय कोर्टात, एएसआयचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी स्पष्ट केले की सर्वेक्षणामुळे बांधकामाचे कोणतेही नुकसान होणार नाही. वैज्ञानिक सर्वेक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी ज्ञानवापी सर्वेक्षणाला परवानगी दिली होती. याला अंजुमन इंतेजामिया मसाजिदने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अलाहबाद हाय कोर्टात आव्हान दिले होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रितिनकर दिवाकर यांच्या एकल खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली.

न्यायालयात युक्तिवाद करताना मुस्लिम पक्षाचे वकील एसएफए नक्वी यांनी जिल्हा कोर्टाच्या ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आदेशामुळे ज्ञानवापीच्या मूलभूत संरचनेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली होती.

अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याचा फटका देशाला बसला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Gyanvapi|Allahbad High Court
Nuh Violence: कोण आहे मोनू मानेसर? ज्याच्यामुळे हरियाणा पेटलेय

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन आणि सौरभ तिवारी म्हणाले की, त्यांना वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे ज्ञानवापीचे सत्य समोर आणायचे आहे.

सुनावणीदरम्यान कोर्टात उपस्थित असलेले राज्याचे महाधिवक्ता अजय कुमार मिश्रा म्हणाले होते की, राज्य सरकार या याचिकेचा पक्षकार नाही, परंतु राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेण्यास तयार आहे.

Gyanvapi|Allahbad High Court
Nitin Gadkari: दरीत कोसळण्यापूर्वीच लागणार गाडीचे ब्रेक; गडकरींनी आणला नवा फॉर्म्युला

ज्ञानवापीचा इतिहास

सर्वप्रथम, 1194 मध्ये महंमद घोरीने विश्वनाथ मंदिर लुटले आणि नष्ट केले. यानंतर १६६९ मध्ये औरंगजेबाने पुन्हा एकदा काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिर पाडले.

असा दावा केला जातो की जेव्हा औरंगजेबाने(Aurangzeb) काशी मंदिर पाडले तेव्हा त्याने त्याच्या संरचनेवर मशीद बांधली.

मशिदीची मागील बाजू अगदी मंदिरासारखी दिसते. यानंतर 1780 मध्ये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com