खुशखबर! पहिल्यांदाच 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार CRPF, BSF आणि CISF च्या परीक्षा

Staff Selection Commission: आता या परिक्षांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत.
CRPF, BSF, CISF, SSC
CRPF, BSF, CISF, SSC
Published on
Updated on

For the first time CRPF, BSF and CISF exams will be held in 13 regional languages:

देशभरातील तरुणांना समान आणि महत्त्वपूर्ण रोजगाराची संधी देण्यासाठी, CRPF, BSF आणि CISF साठी कॉन्स्टेबल भरती परीक्षा प्रथमच हिंदी आणि इंग्रजीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे. .

ही परीक्षा 20 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत देशभरातील 128 शहरांमध्ये होणार आहे. अधिकृत निवेदनानुसार सुमारे 48 लाख उमेदवार परीक्षेला बसण्याची अपेक्षा आहे.

CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवणे, त्यांच्या निवडीची शक्यता वाढवणे आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. गृह मंत्रालयाने (MHA) CAPF साठी कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी सोबत 13 प्रादेशिक भाषांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

CRPF, BSF, CISF, SSC
3 वर्षांनी धमाका! PF वर मिळणार भरघोस परतावा, EPFO ​​ने वाढवला व्याजदर

आता या परिक्षांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत.

CRPF, BSF, CISF, SSC
3 वर्षांनी धमाका! PF वर मिळणार भरघोस परतावा, EPFO ​​ने वाढवला व्याजदर

कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे आयोजित केली जाणारी एक प्रमुख भरती परीक्षा, कॉन्स्टेबल परीक्षा, देशभरातील असंख्य अर्जदारांना आकर्षित करते. निर्णयाची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी, MHA आणि SSC ने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे, देशभरातील युवकांना कर्मचारी निवड आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेत त्यांच्या मातृभाषेत सहभागी होण्याची आणि त्यात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com