जेव्हा नशीब जोरावर असते तेव्हा पैशांचा पाऊस कुठूनही पडू शकतो. आणि असं म्हणतात की देव जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. असाच प्रकार आंध्र प्रदेशातील एका मच्छिमाराच्या बाबतीत घडला. तो समुद्रात मासे पकडायला गेला होता, पण बाकीच्या माशांसोबत सोनेरी मासाही (Golden fish) त्याच्या जाळ्यात अडकला . हा दुर्मिळ प्रजातीचा कचिडी (kachidi) मासा होता. त्याचे वजन 28 किलो होते. मच्छीमाराने तो बाजारात नेऊन विकला असता त्याला तब्बल 2 लाख 90 हजार रुपये मिळाले.
कचिडी मासा दुर्मिळ असल्याने आणि महागड्या दराने विकला जात असल्याने त्याला गोल्डन फिश म्हटले जात असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचे अनेक भाग औषध तयार करण्यासाठी वापरले जातात. या माशांच्या अवयवापासून पित्त मूत्राशय आणि फुफ्फुसांच्या शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारे धागे बनवले जातात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महागडी वाईन बनवण्यासाठीही या माशांचा वापर केला जातो.
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अंतरवेदी येथील रहिवासी असलेला मच्छिमार किनारपट्टी भागातील मिनी फिशिंग हार्बरवर मासेमारी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी हा सोनेरी मासा त्याच्या जाळ्यात अडकला. नंतर तो नरसापुरमच्या बाजारात नेला आणि हा मासा एका व्यापाऱ्याला विकला. त्याबदल्यात माच्छिमाराला 2.90 लाख रुपये मिळाले. मच्छीमाराने आनंद साजरा करताना सांगितले की, हा मासा पकडणे सोपे नाही. कारण हा मासा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खूप वेगाने पळत असतो.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात मच्छिमारांच्या जाळ्यात 157 घोल मासे अडकले होते. समुद्रातील या घोळ नावाच्या सोनेरी माशांनी मच्छिमाराला रातोरात करोडपती बनवले होते. त्यांना प्रत्येक मासळीमागे 85 हजार रुपये मिळाले होते. आणि ते सर्व 157 मासे बाजारात 1.33 कोटी रुपयांना विकले गेले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.