Ahmedabad Video: दुर्दैवी! सातव्या मजल्यावर आगीत अडकून पडलेल्या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

तब्बल 25 मिनिटे ती बाल्कनीत अडकून पडली होती, वाचवण्यासाठी ती लोकांकडे विनवणी करत होती
Ahmedabad
Ahmedabad

अहमदाबादच्या शाहीबाग भागातील 11 मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. या अपघातात एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तब्बल 25 मिनिटे ती बाल्कनीत अडकून पडली होती, वाचवण्यासाठी ती लोकांकडे विनवणी करत होती, पण तिला वाचवता आले नाही. या घटनेचे एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कुटुंबातील चार जणांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Ahmedabad
Purple Festival: रंग 'पर्पल' फेस्टिव्हलचे, पाहा निखळ उत्साहाचे खास क्षण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीबाग येथील गिरधर नगर सर्कलजवळ असलेल्या ऑर्किड ग्रीन फ्लॅटच्या सातव्या मजल्यावर आग लागली. याबाबत अहमदाबाद फायर ब्रिगेडला सकाळी 07.28 वाजता माहिती मिळाली. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.

Ahmedabad
Shashikala Kakodkar: 'ताई' गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये पाच जण होते. चौघे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर 15 वर्षीय प्रांजल खोलीत अडकली, नंतर बाल्कनीकडे गेली आणि जीव वाचवण्याची विनंती करू लागली. सकाळी आठच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. अग्निशमन दलाचे एक पथक 8 व्या मजल्यावर पोहोचले. तिथून दोरी बांधून दोन जण त्या बाल्कनीत पोहोचले. त्याने मुलीला बाहेर काढले. यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रांजल 100 टक्के भाजली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com