हैदराबादमध्ये अग्नितांडव, 11 जणांचा होरपळून मृत्यू

गोडाऊनमधून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या एका कामगाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Hyderabad fire accident News
Hyderabad fire accident NewsDainik Gomantak

हैदराबाद: हैदराबादच्या भोईगुडा भागात बुधवारी पहाटे एका भंगाराच्या गोदामाला आग लागली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. गोडाऊनमधून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या एका कामगाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Hyderabad fire accident News)

Hyderabad fire accident News
आता 'व्हॉइस मेसेज'द्वारेही बुक करता येणार एलपीजी सिलिंडर

"कामगारांना बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग तळमजल्यावरील भंगाराच्या दुकानातून होता ज्याचे शटर बंद होते," एम राजेश चंद्रा, सेंट्रल झोन डीसीपी म्हणाले. अग्निशमन नियंत्रण कक्षाला पहाटे 3 च्या सुमारास अलर्ट मिळाला आणि अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) नऊ गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल तीन तास प्रयत्न केले.

"एक कामगार इमारतीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत," हैदराबादचे सीपी सीव्ही आनंद यांनी सांगितले. "भंगाराच्या गोदामात दारूच्या रिकाम्या बाटल्या, कागद, प्लास्टिक, केबल होत्या. पहिल्या मजल्यावर दोन खोल्या होत्या. तिथून सर्व 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले होते," व्ही पापैया, प्रादेशिक अग्निशमन अधिकारी म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, "बळी पडलेले बहुतेक प्रवासी कामगार आहेत. पीडितांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले."

Hyderabad fire accident News
नव्या नवरी प्रमाणे सजले उत्तराखंड; पुष्कर धामी आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

शहर पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले की, "सर्व पीडित बिहारच्या छपरा जिल्ह्यातील आहेत आणि ते दोन वर्षांपासून 12,000 रुपये मासिक पगारावर काम करत होते." राज्य सरकारने (Government) प्रत्येक पीडितेच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आणि तेलंगणा सरकारकडून मृतदेह रुग्णवाहिकेतून बिहारला पाठवले जातील. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस (Police) याबाबत तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com