Biden On Pakistan: अण्वस्त्रांवर नियंत्रण नसल्याने पाकिस्तान सर्वाधिक धोकादायक देश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा इशारा ; पुतीन यांना 'नाटो' संघटनेत फूट पाडायची होती
Joe Biden
Joe Biden Dainik Gomantak
Published on
Updated on

Biden On Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक धोकादायक देश असल्याचे म्हटले आहे, पाकिस्तानकडे जी अण्वस्त्रे आहेत, त्यावर कुणाचेही लक्ष्य नाही, नियंत्रण नाही. त्यामुळेच पाकिस्तान आजघडीला जगातील सर्वाधिक धोकादायक देश आहे, असे बायडेन म्हणाले.

Joe Biden
Virat's Fan Murder Rohit's Fan: विराट श्रेष्ठ की रोहित? RCB फॅनकडून MI फॅनचा खून

लॉस एंजल्स येथे डेमोक्रोटिक पार्टीच्या कॅम्पेनमध्ये ते बोलत होते. चीन आणि रशियाबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाविषयी चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. दरम्यान, पाकिस्तानकडे 160 अणुबॉम्ब असल्याचा अंदाज आहे.

बायडेन म्हणाले, जिनपिंग यांच्यासोबत मी उपराष्ट्राध्यक्ष असताना बराच काळ व्यतीत केला आहे. जिनपिंग हे असे व्यक्ती आहे, ज्यांना माहितीय त्यांना काय हवे आहे, पण त्यांच्यासमोर बऱ्याच अडचणी आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना नाटो संघटनेत फुट पाडायची होती, पण आता काय होत आहे हे सर्वजण पाहत आहेत. मला वाटते जगात सर्वात धोकादायक देश कोणता असेल तर तो पाकिस्तान आहे.

दरम्यान, पाकिस्तानवर अमेरिकेने टीका केलेली असली तरी अमेरिका पाकिस्तानला सातत्याने मदत करत आला आहे. नुकतेच 8 सप्टेंबर रोजी पाकिस्तानला F-16 या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी 450 कोटी डॉलर म्हणजे 3,581 कोटी रूपये देण्यास बायडेन प्रशासनाने मंजुरी दिली होती. गेल्या चार वर्षात सुरक्षिततेसाठी पाकिस्तानला अमेरिकेने दिलेली ही सर्वात मोठी मदत आहे.

Joe Biden
500 Corpses On Roof: पाकिस्तानातील रूग्णालयाच्या छतावर 500 मृतदेह

अण्वस्त्र वापराबाबत पाकिस्तानचे धोरण

अण्वस्त्रांचा वापर कधी, कसा, कुठे करायचा याबाबत पाकिस्तानचे काहीही धोरण नाही. हे केवळ तेथील लष्करप्रमुख किंवा सर्वोच्च राजकीय नेतृत्वाच्या मनावर अवलंबून आहे. ज्या प्रमाणे भारताचे अण्वस्त्रांबाबत 'नो फर्स्ट यूज' धोरण आहे, तसे पाकिस्तानचे नाही. पाकिस्तान स्वतः प्रथम अण्वस्त्र हल्ला करू शकतो. 1999 मध्ये पाकिस्तानने ‘नो फर्स्ट यूज' धोरण नाकारले होते.

पाकिस्तानकडे भारताहून अधिक अणुबॉम्ब

स्वीडनच्या इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिट्युटच्या रिपोर्टनुसार चीन आणि पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. सध्या चीनकडे 320 पाकिस्तानकडे 160 तर भारताकडे 150 अणुबॉम्ब आहेत. जगाचा विचार करता, रशियाकडे सर्वाधिक 5977 अण्वस्त्रे आहेत. तर अमेरिकेकडे 5428 अण्वस्त्रे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com