Himachal Pradesh Cabinet: अखेर महिन्यानंतर हिमाचल प्रदेशात उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार

7 आमदारांची नावे निश्चित; शपथविधी सोहळ्यासाठी राजभवन सज्ज
Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu
Himachal Pradesh CM Sukhvinder Singh SukhuDainik Gomantak
Published on
Updated on

Himachal Pradesh Cabinet: हिमाचल प्रदेशमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेंस आता संपला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांचे मंत्री उद्या रविवारी, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राजभवनात शपथ घेतील. उद्या सर्व मंत्र्यांऐवजी 7 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री पुण्याला रवाना होतील.

Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu
Weather Update: देशभरात थंडीची लाट कायम; अनेक राज्यांत तापमान शुन्याखाली...

यांना मंत्रिपदाची संधी

सुधीर शर्मा, चंद्र कुमार, जगत नेगी, सुंदरसिंग ठाकूर, राजेश धर्मानी, विक्रमादित्य सिंग यांसोबतच 7 संभाव्य मंत्र्यांमध्ये हर्षवर्धन सिंह चौहान यांच्या नावाचाही समावेश आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आपल्या मंत्र्यांना शपथ देण्यासाठी राज्यपालांना पत्र देण्यासाठी राजभवनात आपला खास दूत पाठवला. त्यानंतरच राज्य भवन सचिवालयाने मंत्र्यांच्या शपथविधीची वेळ निश्चित केली.

मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबामुळे विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत होते. राज्यातील निवडणूक निकालांना महिना उलटूनही मंत्रिमंडळाची बैठक झाली नव्हती. यानिमित्ताने विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला होता. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या स्थापनेला एवढा विलंब होण्याची हिमाचलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे.

Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu
Ahmedabad Video: दुर्दैवी! सातव्या मजल्यावर आगीत अडकून पडलेल्या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

10 पैकी 2 किंवा 3 जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. मागील भाजप सरकारच्या कार्यकाळातही मंत्र्यांची 2 पदे रिक्त होती, जी 3 वर्षांनी भरण्यात आली.

मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. रविवारी, 8 जानेवारी रोजी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे त्यांच्या गोव्यातील घरी जाणार आहेत. ते 15 जानेवारीला परतणार आहेत. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल रविवारी गोव्याला रवाना होतील, अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com