अमरनाथ यात्रेत अढथळा आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न! सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान

तब्बल दोन वर्षांनंतर या वर्षी अमरनाथ यात्रेची पहिली तुकडी 29 जुलैला जम्मू आणि 30 जुलैला काश्मीरमधून निघणार आहे
security scenario & arrangements for Amarnath Ji Yatra.
security scenario & arrangements for Amarnath Ji Yatra. Twitter/@KOSCRPF
Published on
Updated on

Jammu Kashmir: यावर्षीच्या अमरनाथ यात्रेदरम्यान, पाकिस्तान मोठी गडबड पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी सुरक्षा दलांनी राज्यात विस्तृत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. यावेळच्या अमरनाथ यात्रेत स्टिकी बॉम्ब किंवा मॅग्नेटिक बॉम्ब हे सुरक्षा दलांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये रणनीती तयार करण्याचे काम सुरू आहे. तब्बल दोन वर्षांनंतर या वर्षी अमरनाथ यात्रेची पहिली तुकडी 29 जुलैला जम्मू आणि 30 जुलैला काश्मीरमधून निघणार आहे.(Amarnath Yatra 2022)

security scenario & arrangements for Amarnath Ji Yatra.
अमरनाथ यात्रेकरूंना ५ लाखांचा विमा देण्याचा सरकारचा निर्णय | Gomantak Tv

यावेळच्या अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, पाकिस्तान यंदाच्या अमरनाथ यात्रेला नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो. यंदाच्या अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तान ड्रोनद्वारे सीमेपलीकडून केवळ शस्त्रेच नव्हे तर घातक बॉम्ब किंवा चुंबकीय बॉम्बही पाठवत आहे. जम्मू पोलीस आणि सुरक्षा एजन्सीने गेल्या काही काळापासून ड्रोनद्वारे पाठवलेले अशा अनेक मॅग्नेटिक बॉम्बची खेप पकडली आहे.

security scenario & arrangements for Amarnath Ji Yatra.
2 वर्षांनंतर श्री अमरनाथ यात्रेचा उत्साह, 30 जूनपासून सुरू होणार प्रवास

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त

जम्मूचे एडीजी मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यात्रेची सुरक्षा बळकट करण्यासाठी सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे. यासोबतच जम्मू पोलिसांनी प्रत्येक जिल्ह्याच्या एसएसपींना अमरनाथ यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षा दलाच्या माहितीनुसार यावर्षी अमरनाथ यात्रेला सर्वात मोठा धोका पाकिस्तानकडून होण्याची शक्यता आहे, त्यासाठी सर्वसामान्यांकडूनही सहकार्य मागितले गेले आहे. यासोबतच स्टिकी बॉम्ब आणि मॅग्नेटिक बॉम्बच्या धोक्याचा सामना करण्यासाठी जिल्हा एसएसपीही त्यांच्या स्तरावर विशेष पावलं उचलत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com