बंगळूरुमध्ये महिला शास्त्रज्ञाची निर्घृण हत्या, चाकूने केला हल्ला; पोलिसांचा तपास सुरु

Female Scientist Stabbed to Death in Bengaluru: कर्नाटकची राजधानी आणि आयटी हब ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Female Scientist Stabbed to Death in Bengaluru: कर्नाटकची राजधानी आणि आयटी हब ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिला शास्त्रज्ञाची तिच्या घरात भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घरातून तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

भूविज्ञान विभागात उपसंचालक म्हणून रुजू झाल्या होत्या

न्यूज साइट इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बंगळुरु पोलिसांनी रविवारी सांगितले की, कर्नाटक (Karnataka) सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या 37 वर्षीय भूवैज्ञानिकाची बंगळूरु येथे तिच्या घरी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी (Police) सांगितले की, प्रतिमा या कर्नाटकच्या खाण आणि भूविज्ञान विभागात उपसंचालक पदावर कार्यरत होत्या. हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून चाकूने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Crime News
Karnataka Govt Circular: मंदिरांना निधी देण्यावर बंदी घालणारे परिपत्रक अखेर मागे; कर्नाटक सरकारचा निर्णय

पती घरी नव्हता, महिला अधिकारी एकटीच होती

दरम्यान, त्यांचे पती तिर्थहळ्ळी या आपल्या गावी गेले असल्याने हल्ल्यावेळी त्या घरी एकट्याच होत्या. शनिवारी रात्री आठच्या सुमारास चालकाने प्रतिमा यांना त्यांच्या घरी सोडल्याचे चौकशीत समोर आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रतिमा यांच्या भावाने त्यांना अनेकवेळा फोन केला होता, पण प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तो सकाळी त्यांच्या घरी पोहोचला. तिथे त्याने पाहिले की, प्रतिमा यांचा मृतदेह रक्ताने माखलेला होता.

Crime News
Uttar Pradesh Crime: पत्नीचे फेसबुक अकाउंट हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट, मारहाणीनंतर हाकलले घराबाहेर

पोलिस मारेकऱ्याच्या शोधात व्यस्त

दुसरीकडे, कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, या हत्येमागे त्यांच्या ओळखीच्या कोणाचा हात असावा, असा संशय पोलिसांना आहे. तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com