The Kashmir Files: '...संपूर्ण देशात द्वेष निर्माण केला'

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून लाऊस्पीकर (Loudspeaker), हनुमान चालिसा भोवती फिरत आहे.
Farooq Abdullah
Farooq Abdullah Dainik Gomantak

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून लाऊस्पीकर, हनुमान चालिसा भोवती फिरत आहे. यातच काही दिवसांपूर्वी आलेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाने देशातील राजकारण्यांना नवा वादाचा मुद्दा दिला होता. दुसरीकडे, या चित्रपटाने जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीमांना आमने-सामने आणले होते. (Farooq Abdullah said that the film Kashmir Files created hatred in the whole country)

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी सोमवारी सांगितले की, 'गुपकर आघाडीच्या शिष्टमंडळाने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली. काश्मीर पंडितांच्या सुरक्षेवर आणि राज्याच्या इतर समस्यांवर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. रोज लोक मारले जात आहेत. यावर नियंत्रण ठेवायला हवे.'

Farooq Abdullah
The Kashmir Files: शरद पवारांनी सांगितली 90च्या दशकातील काश्मिरी राजकारणाची परिस्थिती

फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले, ''आम्ही एलजी मनोज सिन्हा यांच्यासमोर 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाचा मुद्दाही मांडला. या चित्रपटामुळे संपूर्ण देशात द्वेष निर्माण झाला. राज्यातही या चित्रपटामुळे लोकांमध्ये द्वेषाची भावना वाढली आहे. अनेक माध्यम संस्थाही हिंदू-मुस्लिम यांच्यात सतत द्वेष पसरवत आहेत. अशा माध्यम वाहिन्या बंद केल्या पाहिजेत.''

Farooq Abdullah
Jammu Kashmir: अनंतनागमध्ये दहशतवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, ''कुलगाममधील राजपूत व्यक्तीची हत्या आणि बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येप्रकरणी मला त्यांच्या घरी जायचे होते, परंतु त्यांनी मला जाऊ दिले नाही. मला तिथे जाऊन कोणतेही राजकारण करायचे नव्हते, तर सहानुभूती दाखवायची होती. सरकारही मला जाऊ देणार नसेल, तर एवढे अंतर कसे कमी होणार.''

Farooq Abdullah
Jammu Kashmir: '...हल्ला आधीच नियोजित होता?'

याशिवाय, रविवारी पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (PAGD) च्या शिष्टमंडळाने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली. बैठकीनंतर, एमवाय तारिगामी म्हणाले की, खोरे जितके काश्मिरी पंडितांचे आहे, तितकेच ते काश्मिरी मुस्लिमांचेही आहे. घरातून बाहेर पडू नका असे आम्ही आवाहन करतो. राहुल भटच्या हत्येमुळे काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडायचे असेल, तर मारल्या गेलेल्या काश्मिरी मुस्लिमांच्या कुटुंबांचे काय होईल. राहुलची हत्या झाली तर पोलीस शिपाई रियाजचीही हत्या झाली आहे. रियाझचे कुटुंबीय आणि नातेवाईक कुठे जातील? तुम्ही तुमचे घर सोडू नका. या दु:खद प्रसंगाला आपण एकत्रितपणे तोंड देऊ आणि एकमेकांचे रक्षण करु.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com