कोणत्याही परिस्थितीसाठी तयार रहा; वायुदल प्रमुखांचे सुरक्षा यंत्रणांना आदेश

वायुसेना प्रमुख, WACच्या वरिष्ट अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेला संबोधित करत होते.
Fighter Plane
Fighter PlaneDainik Gomantak
Published on
Updated on

एकीकडे चीन भारताशी चर्चा करत आहे तर, दुसरीकडे तो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. हवाई दलाच्या प्रमुखांनी लडाखचे रक्षण करणाऱ्या वेस्टर्न एअर कमांडला पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांनीही पश्चिम लडाखच्या सीमेवर चीनबरोबर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल बोलताना सुरक्षा दलाच्या कामाचे कौतुक केले आहे. (Chief of Indian Air force has ordered the security agencies to be ready for any situation)


वायुसेना प्रमुख, WACच्या वरिष्ट अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेला संबोधित करत होते. संवेदनशील लडाख प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर अनेक भागातील देशाच्या हवाई क्षेत्राची सुरक्षा हाताळणाऱ्या सुरक्षा दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी सेनापतींना सर्व प्लॅटफॉर्म, शस्त्रास्त्रे आणि संसाधने या सर्व पातळ्यांवर तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Fighter Plane
आणिबाणीच्या त्या काळ्यादिवसांना विसरु शकत नाही: पंतप्रधान मोदी

या बैठकीत कमांडर्सनी देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील देशासमोर असलेल्या सुरक्षा आव्हानांवर सविस्तर चर्चा केली. एअरफोर्स चीफ यांनी यावेळी सुरक्षा यंत्रणांच्या परिस्थितीचे सज्जता आणि सायबर सुरक्षे सारख्या पायाभूत सुविधांचे विस्तृत आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.

"महामारीच्या काळात मोठ्या असूनही आपल्या उत्तरेकडील सीमेवर परिस्थितीत डब्ल्यूएसीमधील सर्व केंद्रांनी दर्शविलेल्या सतर्कता आणि तत्पर्तेबद्दल वायुदल प्रमुखांनी कौतुक केले." अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Fighter Plane
पंतप्रधानाच्या बैठकीमुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या मनात विकासाची पालवी 

गेल्या वर्षी पूर्व लडाखमध्ये तणाव वाढल्यामुळे भारतीय वायुसेनेने सुखोई 30 एमकेआय, जग्वार आणि मिरज-2000 सारख्या सर्व आघाडीच्या लढाऊ विमानांना तैनात केले आहे. तसेच पूर्व लडाखमधील हवाई दलाच्या प्रमुख केंद्रांवर आणि वास्तविक नियंत्रण रेषेवर हेलिकॉप्टरही तैनात ठेवत आले होते. यावेळी त्यांनी वेस्टर्न एअर कमांडच्या फ्लाइट सेफ्टी रेकॉर्डचेही कौतुक केले आणि सर्व कमांडरांना कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com