दो भाई दोनों तबाही! मोठ्याने पदार्पणाच्या सामन्यातच विश्वविक्रम रचला, आता धाकट्याने 'हॅटट्रिक' घेत घातला धुमाकूळ; पाहा Video

Rehan Ahmed Brother Farhan Hat trick At 17: इंग्लंडमध्ये एका युवा क्रिकेटपटूकडून एक मोठी कामगिरी पाहायला मिळाली आहे. १७ वर्षीय गोलंदाजाने हॅटट्रिक घेऊन चर्चेचा विषय बनला आहे.
Rehan Ahmed Brother Farhan Hat trick
Rehan Ahmed Brother Farhan Hat trickDainik Gomantak
Published on
Updated on

Farhan Ahmed Hat Trick Five Wicket Haul Leads Nottinghamshire T20 Blast

सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दुसरीकडे टी-२० ब्लास्टचेही आयोजन करण्यात आलं आहे. २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये चौथी कसोटी सुरू होणार आहे. दरम्यान, नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिजमधून एक मोठी बातमी आली आहे.

खरं तर, १८ जुलै रोजी टी२० ब्लास्टमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात, १७ वर्षांच्या एका गोलंदाजाने हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली आहे. नॉटिंगहॅमशायर आणि लँकेशायर यांच्यात झालेल्या सामन्यात हा पराक्रम पाहायला मिळाला, जिथे इंग्लंडचा फिरकी गोलंदाज रेहान अहमदचा धाकटा भाऊ फरहान अहमदने हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली.

टी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा नॉटिंगहॅमशायरचा पहिला गोलंदाज ठरला. फरहान हा इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये एक उदयोन्मुख गोलंदाज आहे. त्याने १३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३८ बळी घेतले आहेत तर ६ टी२० सामन्यांमध्ये ८ बळी घेतले आहेत. त्याच्या कारकिर्दीतील हा पहिला टी२० ब्लास्ट हंगाम आहे.

Rehan Ahmed Brother Farhan Hat trick
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर गुंडाराज; टोळक्याकडून सिंधुदुर्गच्या तिघांना मारहाण, जबरदस्तीने उकळले पैसे

फरहान अहमदने केवळ हॅटट्रिकच केली नाही तर लँकेशायरच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने ४ षटकांत फक्त २५ धावा देऊन ५ बळी घेतले. या शानदार कामगिरीमुळे नॉटिंगहॅमशायरने लँकेशायरला १२६ धावांवर बाद केले. फरहानने ५ बळी घेतले, तर मॅथ्यू मॉन्टगोमेरी आणि लियाम पॅटरसन-व्हाइट यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

लँकेशायरला १२६ धावांवर बाद केल्यानंतर, नॉटिंगहॅमशायरच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ३ षटकांत १४ धावांच्या आत ४ फलंदाज गमावले. तथापि, या विकेटकीपर-फलंदाज टॉम मूर्सने शानदार अर्धशतक ठोकले, ज्याच्या आधारे नॉटिंगहॅमशायरने १५.२ षटकांत १२७ धावांचे लक्ष्य गाठले.

टॉम मूर्सने ४२ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७५ धावा केल्या. टॉम मूर्स नाबाद परतला नसला तरी त्याच्या खेळीने नॉटिंगहॅमशायरच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. डॅनियल सॅम्सने ९ चेंडूत १७ धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या वादळी खेळीत एक चौकार आणि एक षटकार मारला. लँकेशायरकडून ल्यूक वूड आणि टॉम हार्टलीने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. ल्यूक वेल्सला यश मिळाले.

Rehan Ahmed Brother Farhan Hat trick
Goa University: विद्यापीठात आनंदोत्सव! सर्वांच्या कष्टामुळेच A+; कुलसचिव धुरींचे प्रतिपादन

इंग्लंडच्या रेहान अहमदने पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करत आपले नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत सर्वात तरुण खेळाडू होण्याचा मान पटकावला. या ऐतिहासिक सामन्यात कराचीतील दुसऱ्या डावात त्याने भेदक माऱ्याने पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडवत पाच बळी घेतले. पदार्पणाच्या सामन्यातच पाच बळी घेणारा तो इंग्लंडचा सर्वात तरुण खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com