Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी (IGI) आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अंमलबजावणी संचालनालयाच्या टीमने एका मोठ्या आरोपीला अटक केली. ईडीचे म्हणणे आहे की, आरोपीने सायबर क्राईम आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य लोकांची 5000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. हे आरोपी फसवणुकीचा पैसा व्हाईट करण्यासाठी भारताबाहेर पाठवत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आलेल्या आरोपीची माहिती दिली. ईडीने सांगितले की, सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य जनतेची सुमारे 5,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पुनीत कुमार उर्फ पुनीत माहेश्वरीला 3 एप्रिल रोजी नेपाळहून आगमन झाल्यानंतर लगेचच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 वरुन अटक करण्यात आली, असे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. दिल्लीच्या मोती नगर भागातील रहिवासी असलेल्या कुमारवर सर्वसामान्यांची फसवणूक करणे, गुन्ह्यातून मिळालेला पैसा व्हाईट करण्यासाठी भारताबाहेर पाठवणे अशाप्रकारचे अनेक गंभीर आरोप आहेत.
पुनित कुमार उर्फ पुनित माहेश्वरी याने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये असलेल्या सर्व्हरचा वापर करुन लोकांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीने केला आहे. गेल्या महिन्यात ईडीने याच प्रकरणात आणखी एक आरोपी आशिष कक्करला गुरुग्राममधील हॉटेलमधून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. हे मनी लाँड्रिंग प्रकरण दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा आणि इतर काही ठिकाणी दाखल पोलिस एफआयआरशी संबंधित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.