2 वर्षांपूर्वी आतंकी मुलाचा एन्काऊंटर, आता दहशतवादी हल्ल्यात ASI पित्याचा मृत्यू

लाल बाजार परिसरात दहशतवाद्यांनी रस्त्यावर सुरक्षा कर्तव्य बजावत असलेल्या एका IAS अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर गोळीबार केला.
ASI killed in militant attack at Srinagar’s Lalbazar area
ASI killed in militant attack at Srinagar’s Lalbazar area Dainik Gomantak
Published on
Updated on

Srinagar Terrorist Attack: मंगळवारी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलीस नाका पार्टीला लक्ष्य केले. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक एएसआय ऑफिसर शहीद झाला. लाल बाजार परिसरात दहशतवाद्यांनी रस्त्यावर सुरक्षा कर्तव्य बजावत असलेल्या एका अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाले आहेत. तर ASI मुश्ताक अहमद शहीद झाले आहे. ते कुलगामचा रहिवासी आहे. त्यांच्या शहीद झाल्याची बातमी त्यांच्या घरी पोहोचताच कुटुंबासह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. (ASI killed in militant attack at Srinagar’s Lalbazar area)

एएसआय मुश्ताक अहमद हे रविवारी कुटुंबासोबत ईद साजरी केल्यानंतर सोमवारी दुपारी श्रीनगरमधील लाल बाजार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर रुजू होण्यासाठी घरातून निघाले. खांद्यावर गणवेश आणि हातात बंदूक घेऊन कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. काही तासांनंतर, जागतिक दहशतवादी संघटना, ISIS, त्यांच्या मीडिया फोर्स AMAQ द्वारे, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

ASI killed in militant attack at Srinagar’s Lalbazar area
पाकच्या नापाक कृत्यावर पाणी फेरलं, LOC वर घुसखोरीचा प्रयत्न

श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एएसआय शहीद

हा हल्ला दहशतवाद्यांनी कॅमेऱ्यात कैद केला असून त्यांच्याकडून एके-47 च्या फोटोसह एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान पोलिसांकडून एके-47 हिसकावून घेतल्याचा दावा इसिसने केला आहे. ISIS ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये या गटाच्या 2-3 दहशतवाद्यांनी पिस्तुल आणि AK-47 रायफल घेऊन संपूर्ण हल्ला कसा केला हे दिसत आहे. हल्लेखोर दोन बाजूंनी आले. एक ग्लॉक पिस्तूल घेऊन, टाटा-सुमोच्या मागे शिरले आणि नंतर एके-47 रायफल घेऊन आलेल्या दुसर्‍या हल्लेखोराने समोरून गोळीबार केला.

दहशतवाद्यांनी हल्ला कसा केला?

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या चिनाराच्या झाडामागे लपण्याचा प्रयत्न करताच दुसरा हल्लेखोर मागून आला आणि त्याने आधी झाडाच्या मागे असलेल्या पोलिसावर हल्ला केला आणि नंतर खिडकीच्या काचा फोडून एएसआय मुश्ताक अहमद यांची हत्या केली. 2020 मध्ये मुश्ताक अहमद यांचा धाकटा मुलगा घरातून बेपत्ता झाला आणि दहशतवाद्यांमध्ये सामील झाला. आकिब मुश्ताक हा अवंतीपूर येथील इस्लामिक विद्यापीठातून बी-टेक करत होता, परंतु त्याने हिंसाचाराचा मार्ग निवडला आणि सुरक्षा दलांच्या हातून त्याचा अंत झाला.

2 वर्षांपूर्वी दहशतवादी मुलगा मारला गेला

कुलगामच्या गुद्दूर गावात हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन स्थानिक दहशतवाद्यांसह आकिबला गोळ्या घालून ठार करण्यात आले. दहशतवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हाती न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी ठरवून दिलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार उरी येथील दहशतवादी कब्रस्तानमध्ये त्यांचे दफन करण्यात आले. मुश्ताकने आपल्या हयातीत आकिबला हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परत आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. मुलाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी आता पोलीस अधिकारी असलेले वडीलच दहशतवाद्यांच्या हल्याचे बळी ठरले.

ASI killed in militant attack at Srinagar’s Lalbazar area
श्रीनगरच्या लालबाजारमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, एक ASI शहीद

कुटुंबात मुश्ताक हा एकमेव कमावणारे होते

श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुश्ताक कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. मुश्ताक आपल्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि दोन मुलींना सोडून गेले आहे. या कुटुंबाने दोन्ही बाजूंनी हिंसाचार पाहिला आहे. दहशतवादी मुलगा सुरक्षा दलांकडून मारला आणि पोलिस वडिलांना दहशतवाद्यांनी ठार केले. माजी मुख्यमंत्री डॉ फारूख अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध करत म्हटले की, हे प्रत्येक काश्मिरींचे नशीब आहे, कारण आम्हाला कोण मारत आहे आणि कोण वाचवत आहे हे आम्हाला माहित नाही. बिनडोक हिंसा सुखी कुटुंबांना खाऊन टाकते आणि ASI मुश्ताक अहमद आणि त्यांचे कुटुंब हे हिंसाचाराच्या या चक्राचे उदाहरण आहेत. एकट्या 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत 10 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com