जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपुरा (Rajpura) भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.
Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmir's Pulwama

Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmir's Pulwama

Dainik Gomantak

Published on
Updated on

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपुरा (Rajpura) भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. राजपुरा भागातील उसगम पाथरी येथे ही चकमक सुरू आहे. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणातील अधिक माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे.

याच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पुंछच्या बेहरामगला भागात सशस्त्र दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. मंगळवारी पहाटे झालेल्या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिल्याने चकमक सुरू झाली. ज्यात एक दहशतवादी मारला गेला.

<div class="paragraphs"><p>Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmir's Pulwama</p></div>
आरे काय चाललंय काय? मंत्र्याच्या मुलाच्या लग्नात 'गोळीबार'

AK-47 सह अनेक वस्तू जप्त

चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-47 रायफल, चार मॅगझिन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय सोमवारी श्रीनगरच्या बाहेरील भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार केले. रंगरेथ परिसरात ही चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, दोन दहशतवादी मारले गेले आहेत.

यापूर्वी पुलवामा येथे दहशतवादी मारला गेला होता

रविवारी पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील बरगाम भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com