आरे काय चाललंय काय? मंत्र्याच्या मुलाच्या लग्नात 'गोळीबार'

लग्न समारंभासाठी आयोजित केलेल्या रिसेप्शन पार्टीदरम्यान गोळीबार झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Rajasthan

Rajasthan

Dainik Gomantak 

Published on
Updated on

राजस्थानच्या (Rajasthan) गेहलोत सरकारमध्ये जलसंपदा मंत्री महेंद्रजीत सिंह मालवीय
(Mahendrajit Singh Malviya) यांचा मुलगा आणि भाजप (BJP) सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या धनसिंग रावत (Dhansingh Rawat) यांच्या मुलीच्या लग्न समारंभात गोळीबार झाला. मात्र गोळीबाराच्या घटनेबाबत दोन्ही पक्षांचे नेतेच नव्हे, तर पोलिसांनीही मौन बाळगले आहे. लग्न समारंभासाठी आयोजित केलेल्या रिसेप्शन पार्टीदरम्यान गोळीबार झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वरांच्या बाजूचे लोक पाहुण्यांसह नृत्यादरम्यान गोळीबार करताना दिसत आहेत.

दरम्यान, गेहलोत सरकारमधील कॅबिनेट मंत्री महेंद्रजीत सिंह मालवीय यांचा मुलगा चंद्रवीर सिंग मालवीय याचा सोमवारी भाजप सरकारमधील राज्यमंत्री धनसिंग रावत यांच्या मुलीशी विवाह झाला. सोमवारी रात्री भाजप नेते धनसिंह रावत यांच्या हाउसिंग बोर्ड कॉलनीतील निवासस्थानी त्यांची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. जिथे मोठा पंडाल उभारण्यात आला होता. यात शेकडो पाहुणेही उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Rajasthan</p></div>
जम्मू- काश्मीर पोलिसांची कारवाई, दोन दहशताद्यांना कंठस्नान

रिसेप्शन पार्टीत सेलिब्रेशन दरम्यान गोळीबार

रिसेप्शन पार्टी सुरु असताना काही लोक गोळीबार करत होते. दोन्ही बाजूचे पाहुणे वाहनांसह मोठ्या संख्येने दाखल झाले आणि मुख्य रस्त्यावर रावत यांचे घर असल्याने बांसवाडा पोलिस अधीक्षकांना मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करावा लागला. पोलीस बाहेरील वाहतूक नियंत्रित करण्यात व्यस्त असताना रिसेप्शन पार्टी दरम्यान गोळीबार झाला. त्यावेळी कॅबिनेट मंत्री मालवीयही तिथे उपस्थित होते.

एकमेकांचे कट्टर विरोधक

काँग्रेसचे महेंद्र जीतसिंग मालवीय आणि भाजपचे धनसिंह रावत हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र आता दोघेही व्याही झाले आहेत. दोघेही डुंगरपूर-बंसवाडा लोकसभा मतदारसंघातून खासदार असताना निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर टीकाही करत. दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांच्या मुला-मुलीच्या लग्नात गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनीही मौन बाळगले आहे. तर आर्म्स एक्टमध्ये सुधारणा केल्यानंतर केंद्र सरकारने लग्न किंवा अन्य समारंभात कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने गोळीबार करण्यास बंदी घातली आहे. मात्र याप्रकरणी पोलीसही मौन बाळगून आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com