प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव धुडकावून लावत आपले म्हणणे मांडले आहे.
Prashant Kishor
Prashant Kishor Dainik Gomantak
Published on
Updated on

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव धुडकावून लावत आपले म्हणणे मांडले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, 'पक्षाला नेतृत्वाची गरज आहे. त्याचबरोबर संघटनात्मक समस्यांना तोंड देण्यासाठी सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे.'

रिपोर्ट्सनुसार, प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये (Congress) पूर्ण स्वातंत्र्यासह काम करण्याची इच्छा होती. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी ट्विट करुन म्हटले की, मी काँग्रेसच्या एम्पॉर्ड अ‍ॅक्शन ग्रुपचा भाग म्हणून काँग्रेस पक्षात सामील होण्याची ऑफर नाकारली आहे. आणखी एका ट्विटमध्ये किशोर म्हणाले, "माझा एक नम्र सल्ला आहे की, पक्षाला संरचनात्मक समस्या आणि मोठ्या सुधारणांसाठी सक्षम नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे."

दरम्यान, प्रशांत किशोर यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काँग्रेसने त्यांना वरिष्ठ पदासह पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यांना फक्त चर्चेच्या मंचावर स्थान देण्यात आले. सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले की, "प्रशांत किशोर यांच्यासोबत प्रजेंटेशन आणि चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी एम्पॉर्ड अ‍ॅक्शन ग्रुप 2024 ची स्थापना केली आणि त्यांना या गटाचे सदस्य म्हणून सामील होण्याची ऑफर दिली, ज्यामध्ये त्यांची जबाबदारी देखील निश्चित केली गेली. परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Girl Accidentally Drinks Acid Kanpur
Lieutenant General NS Raja Subramani New CDS
8th Pay Commission
Man Cuts Private Part Temple
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com