कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

Gujrat Accident: महामार्गावर दोन कार समोरासमोर आदळल्या. टक्कर झाल्यानंतर एक कार रस्त्याच्या कडेला पडली आणि तिला आग लागली.
Gujrat Accident
Gujrat Accident
Published on
Updated on

गुजरात: सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वाढवण-लख्तर महामार्गावर दोन कारची टक्कर झाल्यानंतर आग लागली ज्यामध्ये एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले गेले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. रविवारी संध्याकाळी घडली लखतर महामार्गावरील झमार आणि देदाद्रा गावांदरम्यान दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पडली.

या अपघातात कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, हा अपघात वाढवान-लखतर महामार्गावरील देदादरा गावाजवळ घडला. महामार्गावर दोन कार समोरासमोर आदळल्या. टक्कर झाल्यानंतर एक कार रस्त्याच्या कडेला पडली आणि तिला आग लागली.

Gujrat Accident
Goa Rain Update: गोव्यात मुसळधार! राज्यात चार दिवस यलो अलर्ट; महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले

प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघातानंतर आग इतक्या वेगाने पसरली की कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. स्थानिक लोक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे खूप कठीण झाले आहे. घटनेनंतर लगेचच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

Gujrat Accident
Prime Minister Dance: दमादम मस्त कलंदर... शिबानी कश्यपच्या गाण्यावर पंतप्रधानांचा भन्नाट डान्स, रंगली अविस्मरणीय मैफल Watch Video

अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे. वेग जास्त असल्याने गाड्या समोरासमोर आदळल्याचा प्राथमिक अंदाज सुरेंद्रनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com