ED Raid In UP: शिष्यवृत्ती घोटाळ्यासंबंधी ईडीची मोठी कारवाई, यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये छापेमारी

Uttar Pradesh: उत्तरप्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ईडीने आज सकाळी उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांत छापेमारी केली आहे.
ED
EDDainik Gomantak
Published on
Updated on

ED Raid In UP: उत्तरप्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ईडीने आज सकाळी उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांत छापेमारी केली आहे. ईडीने लखनऊ, हरदोई, बाराबंकी, फारुखाबाद आदी जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. ही छापेमारी अजूनही सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या एका प्रकरणासंदर्भात ईडीने ही छापेमारी केली आहे. या जिल्ह्यांतील अनेक शैक्षणिक संस्थांवर ही छापेमारी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील (Lucknow) एका मोठ्या शैक्षणिक संस्थेवर छापा टाकण्यात आला आहे. लखनऊच्या या संस्थेचे नाव HYGIA असे सांगितले जात आहे. या संस्थेत अजूनही ईडीची चौकशी सुरु आहे.

ED
ED summons Hemant Soren: 'ईडी' करणार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी

दरम्यान, शासकीय योजनांसाठी मिळालेल्या निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी छापे टाकण्यात येत आहेत. डॉ. ओमप्रकाश गुप्ता यांच्या फारुखाबाद येथील घरावर ईडीने छापा टाकला आहे. ओमप्रकाश गुप्ता यांच्या हॉस्पिटलवरही छापा टाकण्यात आला.

तसेच, ईडीच्या लखनऊ आणि दिल्लीच्या (Delhi) पथकांनी यूपीमध्ये सुमारे 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. शैक्षणिक संस्थांकडून शिष्यवृत्तीत फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे.

ED
Ed Raid: दारू घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे

लखनऊच्या या संस्थेवर छापेमारी सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील HYGIA संस्थेवर ईडी छापे टाकत आहे. या छाप्यात ईडीचे अधिकारी पॅरा मिलिटरी फोर्ससोबत पोहोचले आहेत. HYGIA संस्थेत 6 गाड्यांमध्ये अधिकारी आणि निमलष्करी दले दाखल झाले आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी संस्थेचे सर्व दरवाजे बंद केले आहेत. यासोबतच ईडीने मीडियाला आतमध्ये येण्यास बंदी घातली आहे. HYGIA संस्था मडियाव पोलीस स्टेशन परिसरातील घैला रोडवर आहे. या संस्थेत अजूनही ईडीची चौकशी सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com