मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चिनी कंपनी Vivo मोबाईल्सवर ईडीची मोठी कारवाई, 4 जणांना अटक

ED Action Against Vivo Mobiles: ईडीने चिनी मोबाईल कंपनी विवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे.
Vivo
Vivo Dainik Gomantak
Published on
Updated on

ED Action Against Vivo Mobiles: ईडीने चिनी मोबाईल कंपनी विवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एका चिनी नागरिकासह 4 जणांना अटक केली आहे, त्यापैकी एक लावा इंटरनॅशनलचा एमडी देखील आहे.

लावा ही भारतीय मोबाईल कंपनी आहे. या सर्व लोकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, 10 लाखांहून अधिक रोकडही जप्त करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये, एजन्सीने कंपनी आणि त्याच्या सहयोगींवर छापा टाकला होता. यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्यांनी चिनी नागरिक आणि अनेक भारतीय कंपन्यांचा समावेश असलेल्या महत्त्वपूर्ण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने अटक केलेल्यांमध्ये चिनी नागरिक अँड्र्यू कुआंग, लावा इंटरनॅशनलचे एमडी हरी ओम राय आणि चार्टर्ड अकाउंटंट राजन मलिक आणि नितीन गर्ग यांना अटक करण्यात आली आहे. ईडीची ही कारवाई विवो मोबाईलवर (Mobile) वर्षभरापूर्वी झालेल्या छापेमारीनंतर करण्यात आली आहे.

Vivo
दिल्ली दारु घोटाळ्यात नवा ट्विस्ट, CBI ने ईडी अधिकाऱ्याला केली अटक!

दुसरीकडे, गेल्या वर्षी ईडीने देशभरात विवो मोबाईलच्या 48 ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कालावधीत विवो मोबाईल्सशी संबंधित 23 कंपन्यांचीही चौकशी करण्यात आली होती. ED च्या मते, Vivo Mobiles India Private Limited ची स्थापना 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली.

याच्याशी संबंधित एक कंपनी आहे, ग्रँड प्रॉस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. याला GPICPL असेही म्हणतात.

या कंपनीच्या स्थापनेत नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.

Vivo
CBI तपास थट्टास्पद, ACB अधिकारी खूनाचा शोध कसा घेणार? गोव्यातील विदेशी पर्यटकांच्या मृत्यूबाबत कुटुंबीय काय म्हणाले?

रिपोर्टनुसार ईडीने आरोप केला आहे की, विवोने भारतात (India) टॅक्स चोरी करुन अवैध मार्गाने चीनला 62,476 कोटी पाठवले आहेत. 2020 मध्ये दोन्ही देशांमधील सीमा तणावानंतर, चिनी कंपन्यांच्या पाठिमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. सरकारकडून TikTok सह 200 हून अधिक मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com