Pakistani Boat: गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानी बोटीतून शस्त्रास्त्रांसह 300 कोटींचे अमली पदार्थ जप्त

भारतीय तटरक्षक दलासह गुजरात एटीएसची संयुक्त कारवाई
Pakistani Boat
Pakistani BoatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pakistani Boat: भारतीय तटरक्षक दलाने ATS सह संयुक्त कारवाईत,गुजरातच्या पाकिस्तानी सागरी सीमेवर एक पाकिस्तानी बोट पकडली असून त्यातून शस्त्रे, दारूगोळा आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या बोटीत 10 पाकिस्तानी नागरिकही होते. आयसीजीने या बोटीतून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह 40 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या अमली पदार्थांची किंमत 300 कोटी एवढी आहे

Pakistani Boat
Pradnya Singh Thakur: चाकुला धार करून ठेवा; लव्ह जिहादींना असेच उत्तर द्यावे लागेल...

तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात एटीएसकडून एक पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत प्रवेश करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. यानंतर, 25 डिसेंबरच्या रात्री एक ऑपरेशन राबविण्यात आले ज्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाने आपले जहाज अरिंजय पाकिस्तानच्या सागरी सीमारेषेवर तैनात केले.

या पथकाने अल सोहेली नावाची पाकिस्तानची मासेमारी बोट अडवली. या बोटीची झडती घेतली असता बोटीतून शस्त्र, दारूगोळा आणि 40 किलो अमली पदार्थ आढळून आले. सध्या बोटीसह चालक दलाला पकडण्यात आले असून पुढील तपासासाठी ती ओखा येथे आणली आहे.

Pakistani Boat
Covid Guidelines: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नियमावली जाहीर, ‘या’ राज्याने केलीय मास्कसक्ती

भारतीय तटरक्षक दल आणि ATS गुजरात यांची गेल्या 18 महिन्यांतील ही सातवी संयुक्त कारवाई आहे आणि अंमली पदार्थांसह शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याच्या कथित तस्करीवरील पहिली कारवाई आहे. या कालावधीत 1930 कोटी रुपयांचे एकूण 346 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून 44 पाकिस्तानी आणि 07 इराणी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Gujarat ATS Drug Seizure
CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams
Pakistani Young Man Viral Video
Morjim Drugs Bust
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com