Pradnya Singh Thakur: वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पुन्हा आता वादग्रस्त विधान केले आहे. हिंदु समुदायाने घरात शस्त्रे तयार ठेवावीत, चाकुला धार करून ठेवावी, हिंदूंच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार हिंदुंना आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे हिंदू जागरण वैदिकच्या दक्षिण विभागीय वार्षिक परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
प्रज्ञा सिंग म्हणाल्या की, घरात शस्त्रे ठेवा. बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी चाकू तरी धारदार ठेवा. काय परिस्थिती निर्माण होईल माहीत नाही. जर कोणी आमच्या घरात घुसून हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे. त्यांच्याकडे जिहादची परंपरा आहे, काही जमले नाही तर ते लव्ह जिहाद करतात. प्रेम असले तरी त्यातही ते जिहाद करतात. संन्यासी त्याच्या देवावर प्रेम करतो. जोपर्यंत सर्व अत्याचारी आणि पापी लोक हटवले जात नाहीत, तोपर्यंत ईश्वराने निर्माण केलेल्या या जगात खरे प्रेम टिकू शकत नाही.
लव्ह जिहाद करणाऱ्यांना जशास तसे प्रत्युत्तर द्या. तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवा, तुमच्या मुलींना शिकवा, घरात शस्त्रे ठेवा, बाकी काही नसेल तर भाजी कापण्यासाठी चाकूही धारदार ठेवा. संधी कधी येईल माहीत नाही. भाजी चांगली कापली की तोंड आणि डोके सुद्धा चांगले कापले जातील. मी स्पष्ट बोलतेय. त्याने आमच्या हर्षावर चाकूने वार केले. त्यांनी आमच्या हिंदू वीर, बजरंग दल, भाजप, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चाकूने छिन्नविछिन्न केले.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शिवमोग्गा येथील हर्षाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 28 फेब्रुवारी रोजी पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी हर्षचा तलवारीने शिरच्छेद केला होता. हर्षाचे आई-वडील, बहिणी सगळे दुःखी असतील, ओलसर डोळ्यांनी बसले असतील, असे मला वाटत होते, पण मी त्याच्या दारात येताच अश्विनी आणि रजनी या दोघी बहिणींनी माझी आरती केली आणि हसतमुखाने माझे स्वागत केले. त्या शूर योद्ध्याच्या बहिणी आहेत. दोन बहिणींमध्ये हर्षा हा एकुलता एक भाऊ होता.
दरम्यान, काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष के. के. मिश्रा म्हणतात की, हे केवळ विध्वंसक खासदारच करू शकतात. ज्याच्या हातात बॉम्ब आहेत, ज्याचा मालेगावसह अनेक बॉम्ब प्रकरणात सहभाग आहे. त्यांचेच प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येमध्ये कोणाचे नाव समोर आले आहे. विध्वंसक विचारच विनाशाकडे घेऊन जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.