भारताच्या डीफेन्स रीसर्च ॲड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) विकसित केलेल्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी ओडिशाच्या बालासोरमध्ये करण्यात आली आहे. या चाचणी दरम्यान, क्षेपणास्त्राने सुमारे 150 किमीचे अंतर पूर्ण केले. या क्षेपणास्त्राला स्वदेशी क्रूझ इंजिन आहे. मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात या क्षेपणास्त्राच्या अधिक चाचण्या घेण्यात येतील. या क्षेपणास्त्राची चाचणी ही चीन आणि पाकिस्तान या देशांविरुद्ध दबाव निर्माण करण्यासाठी महत्वाचे मानले जाते आहे. यापूर्वी भारताने येथून आकाश क्षेपणास्त्राची (Akash NG) यशस्वी चाचणीही केली होती. हे क्षेपणास्त्र भुभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. (DRDO successfully tests nirbhay cruise missile)
यापूर्वी भारताने याठीकाणहून आकाश क्षेपणास्त्राची (Akash NG) यशस्वी चाचणीही केली होती. हे क्षेपणास्त्र भुभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याच्या दोन दिवस आधी DRDOने पोर्टेबल अँटी-टँक गाइडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीही केली.
विशेष म्हणजे भारत आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. या अंतर्गत, भारतीय सैन्य आधुनिकीकरणात व्यस्त असताना, सुरक्षेसाठी नवीन क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्येही पुढे जात आहे. गेल्या महिन्यात भारताने अग्नी क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी केली. शेजारी राष्ट्र पाकिस्तान आणि चीनच्या धोक्याच्या अनुशंगाने भारताला आद्ययावत तंत्रज्ञानाने तयार राहणे आवश्यक आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.