Pinaka Rockets: बालासोर अन् पोखरणमध्ये 'पिनाका रॉकेट' ची यशस्वी चाचणी; Video

DRDO: डीआरडीओ (DRDO) द्वारे पूर्णपणे स्वदेशीरित्या विकसीत केलेल्या 'पिनाका' रॉकेटची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.
Pinaka Rockets
Pinaka RocketsDainik Gomantak
Published on
Updated on

Pinaka Rockets: डीआरडीओ (DRDO) द्वारे पूर्णपणे स्वदेशीरित्या विकसीत केलेल्या 'पिनाका' रॉकेटची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. पिनाकाच्या वाढीव क्षमतेची बालासोर आणि पोखरणमध्ये गेल्या काही आठवड्यात चाचणी घेण्यात आली. संरक्षण क्षेत्रातील 'मेक इन इंडिया' च्या यशामध्ये, म्युनिशन इंडिया लिमिटेड आणि इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडसह इतर उत्पादकांनी ही चाचणी पूर्ण करण्यात आणि पिनाकाची क्षमता वाढविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

रॉकेट प्रणालीबद्दल जाणून घेऊया

पिनाका एमके-आय ही एक अपग्रेडेड रॉकेट प्रणाली आहे, ज्याची यापूर्वी अनेक वेळा यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. डीआरडीओच्या तंत्रज्ञानावर आधारित या रॉकेट यंत्रणा विकसित करण्यात आल्या आहेत. पिनाका एमके-आय रॉकेट सिस्टिमची रेंज सुमारे 45 किमी आहे. त्याच वेळी, पिनाका-II रॉकेट प्रणालीची रेंज 60 किमी आहे. रॉकेट प्रणालीची रचना दोन DRDO प्रयोगशाळा, ऑर्डनन्स हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (HEMRL) आणि संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE) यांनी संयुक्तपणे केली आहे.

Pinaka Rockets
Akasa Air's Data Leakage: प्रवाशांची वैयक्तिक माहिती लीक...

1980 मध्ये विकसित

पिनाका रॉकेट शत्रूचे जवळील टारगेट नष्ट करते. हे शॉर्ट रेंज इन्फट्री, आर्टिलरी आणि शस्त्रास्त्रे असलेल्या वाहनांना लक्ष्य करते. DRDO ने 1980 मध्ये पिनाका रॉकेट प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली होती. यानंतर 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात 'पिनाका मार्क-वन' च्या यशस्वी चाचणीने भारतीय लष्कराला (Indian Army) मोठी ताकद दिली. पिनाका प्रणालीच्या एका बॅटरीमध्ये सहा लाँच वाहने आहेत. पिनाका-2 हे क्षेपणास्त्र गाइडेड मिसाइलच्या रुपात तयार करण्यात आले आहे.

Pinaka Rockets
Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर'ची पहिली हवाई यात्रा

कारगिल युद्धात पिनाका मार्क-1 चा वापर

1999 च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्याने पिनाका मार्क-1चा वापर केला होता, ज्याने पर्वतीय चौक्यांवर पाकिस्तानी स्थानांना अचूकपणे लक्ष्य केले आणि शत्रूला युद्धात माघार घेण्यास भाग पाडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com