Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर'ची पहिली हवाई यात्रा

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान भरले पहिले उड्डाण
Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर'ची पहिली हवाई यात्रा

शेअर मार्केट किंग गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांनी प्रवासी विमान सेवा उद्योगात पाऊल ठेवले आहे. 'अकासा एअर' (Akasa Air)) या कंपनीचे झुनझुनवाला मालक आहेत. अकासा एअरच्या पहिल्या व्यावसायिक विमानाने मुंबई ते अहमदनगर दरम्यान उड्डाण भरले. या विमानाला विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय मंत्री व्ही. सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. अकासा एअराला सात जुलै रोजी विमान वाहतूक नियामक DGCA कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळाले आहे.

अकासाचा कमी किमतीत मुंबई-अहमदाबाद विमान प्रवास आजपासून सुरू झाला आहे. याशिवाय मुंबई-बेंगळुरू आणि मुंबई-चेन्नईसाठी अकासाच्या फ्लाइट लवकरच सुरू होणार आहेत. अकासाकडे बोइंग 737 मॅक्स विमान आहेत.

Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर'ची पहिली हवाई यात्रा
Goa Rain Update: गोव्यासह कोकण किनारपट्टीवर येत्या 4 तासात मुसळधारेची शक्यता

अकासा लवकरच बेंगळुरू-कोची, बेंगळुरू-मुंबई आणि चेन्नई-मुंबई मार्गांवर व्यावसायिक उड्डाणे सुरू करणार आहेत. 13 ऑगस्ट पासून बेंगळुरू-कोची, 19 ऑगस्टपासून बेंगळुरू-मुंबई आणि 15 सप्टेंबरपासून चेन्नई-मुंबई अशा फ्लाइट सुरू होणार आहेत.

अकासा एअरमध्ये कुणाचा किती वाटा?

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची अकासा एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी आहे. दोघांचा एकत्रित वाटा 45.97 टक्के एवढा आहे. विनय दुबे, संजय दुबे, नीरज दुबे, माधव भातकुली, पीएआर कॅपिटल व्हेंचर्स, कार्तिक वर्मा हे देखील आकाशामध्ये सह भागीदार आहेत. झुनझुनवाला नंतर, विनय दुबे यांच्याकडे आकाशामध्ये सर्वाधिक 16.13 टक्के हिस्सेदारी आहे. असाका चालवण्याची जबाबदारी विनय दुबे यांच्याकडे आहे.

Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर'ची पहिली हवाई यात्रा
Margao News: मडगाव रेल्वे स्टेशनवर आईनेच दोन मुलींना सोडलं

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com