
Budget Session 2025 Political Controversy: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली. मात्र, राष्ट्रपतींच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपसह एनडीए पक्ष सोनिया गांधींवर जोरदार टीका करत आहेत. एवढचं नाहीतर भाजपच्या 21 खासदारांनी आता संसदेत विशेषाधिकार प्रस्ताव आणला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी समुदयातून येतात हे काँग्रेसला खुपतं, असा घणाघात यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला. भाजप आणि एनडीएच्या इतर घटक पक्षांनी स्पष्टपणे म्हटले की, काँग्रेसची उच्चभ्रू संस्कृती एका सामान्य, गरीब आणि आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेलं पाहू शकत नाही. दुसरीकडे मात्र, काँग्रेसने भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांना हे षड्यंत्र असल्याचे म्हटले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यावर काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी यांनी सडकून टीका केली होती. पुअर लेडी म्हणजे बिच्चारी महिला अशा शब्दात सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींवर टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रपतींच्या टीकेवरुन काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले.
सोनिया गांधींच्या वक्तव्यानंतर, राष्ट्रपती भवनाने एक प्रेस रिलीज जारी करुन ही टिप्पणी अपमानास्पद आणि राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी असल्याचे म्हटले. राष्ट्रपती भवनाने म्हटले की, 'सत्यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. राष्ट्रपती थकलेल्या दिसत नव्हत्या. आपल्या भाषणादरम्यान त्या उपेक्षित समुदाय, महिला आणि शेतकऱ्यांबद्दल बोलत होत्या. त्या बिलकुल थकलेल्या नव्हत्या.'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सोनिया गांधी यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध केला. मोदी म्हणाले की, 'काँग्रेसच्या राजघराण्याने राष्ट्रपतींचा अपमान केला आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा आदिवासींबद्दल त्यांचे काय मत आहे ते दाखवून दिले. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गरीब महिला म्हणून संबोधून देशातील तमाम आदिवासींचा अपमान केला आहे.'
जुलै 2024 मध्ये, लोकसभेत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुनही मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळीही भाजपने आरोप केला होता की, मुर्मू आदिवासी समुदायातून येतात म्हणूनच काँग्रेस जाणूनबुजून त्यांचा अपमान करत आहे. त्यावेळी, भाजपने (BJP) अधीर रंजन चौधरी यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली होती. चौधरी यांचे हे वक्तव्य आदिवासी समुदयातून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या महिलेचा हा घोर अपमान असल्याचे भाजपने म्हटले होते. तथापि, चौधरी यांनी त्यांच्या खराब हिंदीचा हवाला देत माफी मागितली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.