Cough Syrup: भारतातील खोकल्याची 'ही' दोन औषधे लहान मुलांना देऊ नका; WHO चा इशारा

उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे.
Cough Syrup
Cough SyrupDainik Gomantak
Published on
Updated on

उझबेकिस्तानमध्ये (Uzbekistan) 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना उझबेकिस्तानच्या अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपर्कात असून, नोएडास्थित कंपनी मेरियन बायोटेकने बनवलेले दोन कफ सिरप वापरू नयेत. असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

उझबेकिस्तान सरकारने नोएडा येथील मेरियन बायोटेकच्या सिरप 'डॉक-1 मॅक्स' या खोकल्याच्या औषधाला मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.

Cough Syrup
UPI Goes Global: UPI आता परदेशातही, 'या' 10 देशांत राहणाऱ्या भारतीयांना मिळणार सुविधा

मॅरियन बायोटेकने डब्ल्यूएचओला या औषधाच्या सुरक्षिततेची आणि गुणवत्तेची हमी दिलेली नाही, असे संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी (11 जानेवारी) उझबेकिस्तानमधील मुलांसाठी दोन भारतीय कफ सिरप - अँब्रोनॉल सिरप आणि डॉक-1 मॅक्स सिरप - वापरू (Ambronol Syrup And DOK-1 Max Syrup)) नयेत अशी शिफारस केली आहे. मेरियन बायोटेकद्वारे उत्पादित कफ सिरप ही गुणवत्ता मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने आहेत. असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

Cough Syrup
Arvind Kejriwal: दहा दिवसात 164 कोटी द्या; अरविंद केजरीवाल यांना वसुलीची नोटीस

भारतीय कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल हा विषारी पदार्थ असल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. देशातील मुलांनी नोएडास्थित मेरियन बायोटेकचे 'डॉक-1 मॅक्स' कफ सिरपचे सेवन केले होते. त्यानंतर त्या मुलांचा मृत्यू झाला. असे उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे मुलांना प्रमाणापेक्षा जास्त डोस देणे अत्यंत धोकादायक आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, यूपी ड्रग कंट्रोलर आणि सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, सिरपचे नमुने चंदीगडला पाठवण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com