'तो पर्यंत भारताला चीनसमोर झुकावेच लागेल': मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी रविवारी मुंबईतील आयईएस राजा शाळेत ध्वजारोहण (Flag Hosting) केले.
Don't depend on China: RSS chief Mohan Bhagwat
Don't depend on China: RSS chief Mohan BhagwatDainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी रविवारी मुंबईतील आयईएस राजा शाळेत ध्वजारोहण (Flag Hosting) केले. या दरम्यान त्यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्यावर भाष्य केले असून आरएसएस प्रमुख म्हणाले, 'आम्ही इंटरनेट आणि तंत्रज्ञान (Internet & Technology) वापरतो. जे मुळात भारतातून आलेले नाही. आम्ही चीनबद्दल (China) कितीही ओरडलो तरी तुमच्या फोनमध्ये जे काही आहे ते चीनमधून येते. जोपर्यंत चीनवर अवलंबित्व आहे, तोपर्यंत आपल्याला चीनपुढे झुकावे लागेल.(Don't depend on China: RSS chief Mohan Bhagwat)

तत्पूर्वी, लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, अलेक्झांडरच्या हल्ल्यापूर्वीही देशावर आक्रमणकर्त्यांचा ओघ होता. आम्ही 15 ऑगस्टला त्याला पूर्णविराम दिला. मोहन भागवत म्हणाले की, जर कोणत्याही परकीय आक्रमकाचे पाय आमच्या भूमीवर पडले तर संघर्ष सुरू झाला असता. लढाई लढणारे महान पुरुष प्रेरणा देतात. त्याची आज आठवण झाली पाहिजे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपले राज्य मिळाले.

ते म्हणाले की जर तुम्ही आपला राष्ट्रध्वज बघितला तर तुम्हाला समजेल की तुम्हाला कसे राहावे लागेल कारण राष्ट्रध्वजातील केशर त्याग आणि शुद्धतेची प्रेरणा देते. आमचा ध्येय असा समाज निर्माण करणे आहे जो आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातो. त्यासाठी भारताला स्वतंत्र करावे लागेल, आम्ही ते करू. पांढरा रंग शुद्धतेच्या सत्यतेचे प्रतीक आहे.

Don't depend on China: RSS chief Mohan Bhagwat
"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास": मोदींचा नवीन नारा

तर दुसरीकडे तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चीनला विस्तारवादाचे धोरण आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, भारत दोन्ही आव्हानांना चोख प्रत्युत्तर देत आहे.तसेच ते म्हणाले की 21 व्या शतकातील भारताच्या स्वप्नांच्या पूर्ततेला कोणताही अडथळा रोखू शकत नाही.

चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले, "आज जग भारताकडे एका नवीन दृष्टीकोनातून पाहत आहे आणि या दृष्टीचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. एक दहशतवाद आणि दुसरा विस्तारवाद. भारत या दोन्ही आव्हानांचा सामना करत आहे आणि कुशलतेने मोठ्या धैर्याने प्रतिसाद देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com